Anil Ambani luxurious house : अनिल धीरूभाई अंबानी हे देशातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. ते एक भारतीय अरबपती, रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात बऱ्याच चढ उतारांचा सामना केला. परंतु काही महिन्यांपासून अनिल अंबानी हे अडचणीत आलेले आहे. याचे कारण म्हणजे ईडीने त्यांची 3 हजार करोड रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
या संपत्तीत अनिल अंबानी यांचा मुंबई येथील 17 मजली बांगला देखील जप्त करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. तर पाहूया त्यांच्या आलिशान घराची खासियत.
66 मीटर एवढी उंची
उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुंबईतील सर्वात पॉश परिसर पाली हील एरिया मध्ये असलेल्या 17 मजली इमारतीचे नाव Abod अबोर्ड असे आहे. त्यांचे हे घर मुंबईतील सर्वात उंच इमारतींपैकी एक आहे. या इमारतीची उंची 66 मीटर एवढी असून अनिल अंबानी यांची 150 मीटर उंची इमारत बनवण्याची इच्छा होती परंतु उंच कन्स्ट्रक्शनसाठी त्यांना परवानगी मिळाली नाही.
अनेक हेलिकॉप्टर एकाच वेळी लँड
Abod या अनिल अंबानींच्या घरात बऱ्याच जिम आणि गॅरेज बनवण्यात आले आहे. या घराच्या रूफ-टॉप वर हेलीपॅड तयार करण्यात आले असून या ठिकाणी अनेक हेलिकॉप्टर एकाच वेळी लँड करू शकतात.
घराचे इंटेरियल
उद्योगपती अनिल अंबानी यांनी घराच्या सजावटीसाठी नामांकित पेंटर्स यांनी बनवलेली पेंटिंग लावण्यात अली आहे. आणि अँटिक वस्तूंच्या मदतीने घर सजवले आहे. त्यांनी घराच्या सजावटीत कोणत्याही गोष्टीची कमी ठेवलेली नाही. त्यांच्या घराचे इंटेरियर इंटरनॅशनल आर्किटेक्ट ने डिझाईन केलेले आहे.
मुंबईतील स्कायलाईन चा पूर्ण शानदार व्ह्यू
त्यांच्या घरात आरामदायक रिक्लाइनर्स , महागडे सोफा आणि रॉयल क्लास विंडोज यासारख्या महागड्या वस्तू ठेवण्यात आले आहेत. या घरात फॅमिली मेंबर साठी एक असा मजला आहे जिथे मुंबईतील स्कायलाईन चा पूर्ण शानदार व्ह्यू बघायला मिळतो.
एवढेच नाही तर आयएफएलने 2018 जानेवारी मध्ये भारतातील सगळ्यात महागड्या घरांच्या लिस्टमध्ये अनिल अंबानी यांच्या घराचा दुसरा नंबर असल्याचे सांगितले आहे. या वेबसाईट नुसार अनिल अंबानी यांच्या घराची किंमत 5000 करोड रुपये पेक्षा जास्त आहे. (Anil Ambani luxurious house)






