migraine in women: अनेक महिला मायग्रेन या तीव्र डोकेदुखीच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. मायग्रेन हा सामान्य डोकेदुखीपेक्षा वेगळा असतो. चला तर जाणून घेऊयात यावर उपाय काय आहे.
आजकाल अनेक महिलांना मायग्रेन म्हणजेच तीव्र डोकेदुखीच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. मायग्रेन हा सामान्य डोळेदुखीपेक्षा वेगळा असतो, आणि सहसा डोक्याच्या एका बाजूला सतत वेदना निर्माण होतात. यासोबतच, उलट्या होणे, मळमळणे, तीव्र प्रकाश आणि आवाजामुळे भीती वाटणे, चक्कर येणे, थकवा किंवा अशक्तपणा यांसारखी लक्षणेही जाणवतात.
हेही वाचा: CTET 2026 चा निकाल जाहीर; ‘असा’ चेक करा स्कोअरकार्ड
मायग्रेनची समस्या बहुतेकद महिलांची जीवनशैली, तणाव आणि हार्मोनल बदलांशी संबंधित असते. योग्य काळजी न घेतल्यास, ही समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते.
महिलांमध्ये मायग्रेनची प्रमुख करणे
हार्मोनल बदल
मासिक अनियमितपणे येणे, गर्भधारण, रजोनिवृत्तीमुळे शरीरातील हार्मोन्सलमधील इनबॅलन्स यामुळे मायग्रेनचा त्रास वाढतो.
तणाव आणि मानसिक दबाव
अतिरिक्त काम, चिंता आणि मानसिक थकवा यामुळे वेदना वाढतात.
अनियमित झोप
रात्री उशिरा जाग येणे, झोप पूर्ण न होणे, पुरेशी विश्रांती न मिळणे हे घटक मायग्रेनचा त्रास सुरू करतात.
पर्यावरणीय घटक
मोठा आवाज, तीव्र प्रकाश किंवा सतत स्क्रीन पाहिल्याने वेदना वाढू शकतात.
आहार
सतत जंक फूड, दीर्घकाळ उपवास करणे किंवा अनियमित आहार घेणे हे देखील एक कारण असू शकते.
हे सोपे उपाय करा
रोज वेळेवर झोपणे आणि पुरेशी झोप घेणे
योग, प्राणायम किंवा ध्यान करा
जास्त वेळ स्क्रीन पाहणे टाळा.
वेळेवर जेवण करा, जंक फूड कमी करा आणि भरपूर पाणी प्या
दररोज हलका व्यायाम करा आणि आपले शरीर सक्रिय ठेवा
या गोष्टी लक्षात ठेवा
जर मायग्रेनचा त्रास वारंवार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
मायग्रेनचा कारणीभूत ठरणारे घटक ओळख आणि त्यांच्यापासून दूर राहा
वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.












