Sardar Vallabhbhai Patel inspirational quotes : सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्य भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री होते. त्यांची आज 150 वी जयंती आहे. त्यांना लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. त्यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे.
लोहपुरुष म्हणून ओळखले जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर 1875 रोजी गुजरात येथील नाडियाद शहरात झाला होता. त्यांचे विचार आजही तरुणांना प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारातून आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी अनुभव मिळतात. ते पेशाने वकील होते. त्यांनी 562 संस्थानांचे भारतामध्ये विलनीकरण केले. याशिवाय भारताला एक संघराष्ट्र बनवण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतीय महिलांनी सरदार ही उपाधी दिली होती.ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान बनले होते. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब आणि दिल्ली येथील राहणाऱ्या निर्वासितांना मदत केली. भारत पाकिस्तान फाळणी नंतर उभारलेल्या हिंसाचारा नंतर शांती स्थापनेचे देखील त्यांनी कार्य केले होते.
हे हि वाचा : जाणून घ्या शेफ विकास खन्ना यांचा फिटनेस मंत्र; 53 व्या वर्षीही दिसतात फिट
मुत्सद्येगिरी व वेळ पडल्या सैन्यबळ वापरून सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थाने भारतात विलीन केले आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून नावारूपास आले. भारताची एकता आणि अखंडता यांच्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस हा भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिवस म्हणून घोषित केलेला आहे. तसेच राष्ट्र उभारणीमध्ये देखील त्यांचे मोठे योगदान आहे.
जाणून घेऊया त्यांचे प्रेरणादायी विचार Sardar Vallabhbhai Patel inspirational quotes
आपण भेदभाव विसरून एकत्र आलो पाहिजे, एकता हेच आपल्या राष्ट्राचं खरं बळ आहे. जेव्हा जनता एक दिलाने उभी राहते तेव्हा कोणतीही शक्ती तिला थांबवू शकत नाही.
दोन गुणांनी राष्ट्र उभे राहतो ते म्हणजे ध्येय आणि शिस्त. या दोन गोष्टींचा मोल जाणलं पाहिजे, भीती आणि दुर्बलतेतून नव्हे तर निर्धारातून आपण प्रगतीचा मार्ग तयार करत असतो.
देशासाठी काम करत असताना स्वार्थ विसरणे गरजेचे आहे, याचे कारण म्हणजे राष्ट्रसेवेमध्ये खरं समाधान आहे आपल्या कृतीने लोकांमध्ये आरसा निर्माण केली तोच खरा देशभक्त ठरतो
एकजुटीने जाणणारा समाज कधीही हरत नसतो कारण एकता म्हणजे शक्तीचा मूळ आणि आपण सर्वजण भारताचे पुत्र आहोत आपलं ध्येय देशाला सर्वोच्च स्थानी नेऊन पोहोचवणे हे आहे.












