ज्योतिषशास्त्रात चांदीच्या वस्तू वापरण्यामागे काही महत्त्वाचे कारणे सांगितले आहे. या कारणांनुसार घरात सुख समृद्धी देखील लाभत असल्याचं सांगण्यात येतं. यासोबतच हिंदू धर्मामध्ये, चांदी पासून बनवण्यात आलेली हत्तीची मूर्ती वापरणे देखील शुभ मानले जाते. हत्तीला गणेशाचे स्वरूप मानतात. याशिवाय लक्ष्मीची सवारी म्हणून देखील हत्ती ओळखला जातो. चांदी आणि हत्ती हे दोन्ही शुभ असल्यामुळे घरात ठेवल्यास शुभ बातमी मिळते. आणि धन संबंधी अडचणी निर्माण होत नाही.
वास्तुशास्त्रानुसार, शुभ प्राण्यांपैकी एक असलेला हत्ती घरासाठी भाग्यशाली मानले जाते. घरामध्ये चांदीचा हत्ती ठेवल्यामुळे धन वाढ, नात्यांमध्ये मधुरता येते, अनैतिकता पासून मुक्ती मिळते, घरामध्ये पवित्रता आणि पवित्र वातावरण निर्माण होते. यासोबतच घरात सुख शांती समृद्धी वाढते. तुम्ही देखील घरामध्ये हत्तीची चांदीची मूर्ती ठेवत असाल तर भगवान गणपती आणि देवी लक्ष्मीची कृपा तुम्हाला प्राप्त होईल. जाणून घेऊया चांदीच्या हत्तीची मूर्ती ठेवल्यामुळे कोणकोणते फायदे होतात.
1. घरामध्ये हत्तीची चांदीची मूर्ती ठेवल्यामुळे व्यक्तींच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. घरातील व्यक्तींचा बौद्धिक विकास होतो. यासोबतच सामाजिक आणि राजनीतिक स्तरावर मानसन्मान वाढतो.
2. घराच्या उत्तर दिशेमध्ये हत्तीचा जोडा ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते. चांदीचा हत्ती घरात ठेवल्यामुळे धनलाभ होतो.
3. जर तुमच्या कुंडलीमध्ये राहू पाचव्या आणि बाराव्या भावात असेल तर घरामध्ये हत्तीची चांदीची मूर्ती ठेवा. जेणेकरून राहू शांत होईल.
4. घरामध्ये चार चांदीचे हत्ती जोडी ठेवली तर धन कमवण्यासाठी नवीन स्रोत तयार होतील. करियर आणि व्यवसायामध्ये देखील यामुळे वाढ होऊ शकते.
5. अभ्यासाच्या खोलीमध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्यावर मुलांचे अभ्यासात मन लागेल. मुलांची एकाग्रता वाढेल.
6. बेडरूम मध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्यास पती-पत्नीच्या नात्यांमध्ये मधुरता येईल.
7. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या में दरवाजाच्या समोर हत्तीची मूर्ती ठेवल्यास घरामध्ये धनाचे आगमन होते.
8. दोन प्राप्तीसाठी घर किंवा दुकानांमध्ये हत्तीची मूर्ती ठेवण्याचा विचार करत असाल तर, हत्तीची सोंड वर असलेली मूर्ती ठेवा.
9. चांदीच्या हत्तींचा जोडा ठेवताना हत्तीचे मुख हे एकमेकांकडे असणे गरजेचे आहे.
10. कुटुंबामध्ये सुख शांती मिळावी म्हणून हत्तीची मूर्ती ठेवत असाल तर हत्तीची सोंड ही झुकलेली किंवा खाली पाहिजे.