Top 5 Energy-Boosting Drinks for Summer Office Days: उन्हाळ्याची चाहूल लागली असून तापमानही हळूहळू वाढत आहे. त्यामुळे ऑफिसमध्ये दिवसभर ऍक्टिव्ह राहण्यासाठी हे ५ एनर्जी बूस्ट करणारे डिंक्स पिणं फायदेशीर ठरू शकतं.
उन्हाळ्यात वाढलेले तापमान आणि सतत घाम यामुळे शरीर लवकर थकते. ऑफीसमध्ये दिवशभर काम करताना अनेकांना थकवा, डोकेदुखी किंवा एकाग्रतेची समस्या जाणवते. अशावेळी शरीराला पुरेसे हायड्रेशन मिळणं खूप गरजेचं असतं. योग्य पेयांचा आहारात समावेश केल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवशभर फ्रेश राहण्यास मदत होते.
हेही बातमी वाचा: महिला दिनानिमित्त ‘स्पेशल वन’ला गिफ्ट द्यायच आहे? मग ‘हे’ बजेट फ्रेंडली 5 वस्तू बघाच!
नारळपाणी
नारळपाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट ड्रिंक मानलं जातं. यात पोटॅशियम आणि इतर आवश्यक खनिजे भरपूर असतात. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते आणि थकवा कमी होतो.
लिंबूपाणी
लिंबाचा रस, थोडं मीठ किंवा मध घालून तयार केलेलं लिंबूपाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करतं. हे पेय उष्णतेमुळे येणारा थकवा कमी करून शरीराला ताजेतवाने ठेवतं.
इन्फ्युज्ड वॉटर
साध्या पाण्यात लिंबू, काकडी किंवा पुदिन्याची पाने घालून तयार केलेलं इन्फ्युज्ड वॉटर शरीराला ताजेतवाने ठेवतं. हे पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं आणि पचनक्रियाही सुधारते.
ताक, हर्बल चहा आणि सूप
ताक, तुळशी किंवा पुदिन्याचा हर्बल चहा तसेच हलकं सूप हे देखील शरीरासाठी फायदेशीर ठरतात. हे पेय शरीराला आवश्यक द्रव देतात आणि दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत करतात.
ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील टॉक्सिन्स कमी करण्यास मदत करतात. तसेच हे पेय हलकी ऊर्जा देतं आणि मन शांत ठेवण्यासही मदत करतं.
सब्जा किंवा चिया सीड वॉटर
सब्जा किंवा चिया बिया पाण्यात भिजवल्यावर फुगतात आणि शरीराला थंडावा देतात. हे पेय हायड्रेशन टिकवून ठेवण्यास मदत करतं आणि उष्णतेपासून आराम देते.











