मुंबईला लवकरच आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळण्याची शक्यता आहे. मुंबई ते मंगळुरू हा नवीन मार्ग वंदे भारत ट्रेनसाठी सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वेकडून तयार केला जात आहे. सध्या मुंबईहून पुणे, सोलापूर, कोल्हापूर, शिर्डी आणि इतर अनेक महत्त्वाच्या शहरांकरिता वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. आता या यादीत मुंबई ते मंगळुरू या मार्गाचं नावही समाविष्ट होऊ शकतं.मुंबई ते मंगळुरू या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केल्या जात होती. रेल्वे प्रशासनाने या मागणीचा गंभीरपणे विचार केला आहे आणि आता त्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा मास्टरप्लॅन तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही उच्च दर्जाची, अत्याधुनिक सुविधा असलेली ट्रेन आहे, जी प्रवाशांना आरामदायक आणि जलद प्रवासाचा अनुभव देते. त्यामुळे मुंबई ते मंगळुरू या मार्गावर या ट्रेनची सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना मोठा लाभ होईल, असे मानले जात आहे. मात्र, या वंदे भारत ट्रेनच्या सुरूवातीला काही आव्हानं असू शकतात, ज्यामध्ये मार्गाच्या अवसंरचनेचा प्रश्न, ट्रेनसाठी आवश्यक असलेली सुविधांची तयारी आणि प्रवाशांची अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी समाविष्ट आहे. रेल्वे प्रशासन या सर्व बाबींचा विचार करत आहे, आणि लवकरच या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.












