lessons learned in 2025 welcome New year 2026 : आपण सर्वजण नवीन वर्षाच्या आगमनासाठी तयार झालो आहोत. 2025 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आता फक्त आणि फक्त आजचा दिवस बाकी आहे. या नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर असताना मागील वर्षाकडे वळून पाहणे गरजेचे आहे. या सरत्या वर्षात घडलेल्या चांगल्या वाईट आठवणींना उजाळा देणे देखील आवश्यक आहे. आठवणींना दिलेला उजाळा हा फक्त आठवणींचा खेळ नसून हा काही तरी शिकण्याचा आणि पुढील वाटचालीसाठी स्वतःला अधिकच सक्षम करण्याचा क्षण आहे.
अपयश म्हणजे शेवट नाही
2025 हे वर्ष अनेक अर्थाने महत्वपूर्ण ठरले. काहींनी या वर्षात यशाचे शिखर गाठले तर काहींना अपयशाचा सामना करावा लागला. कोणी करिअरसाठी नव्याने सुरुवात केली तर काही मात्र करिअर सोडून संसारात रमल्या. आणि काही जणी तर नव-माता बनल्या. अनेकांच्या आयुष्याला दिशा देण्याचे काम या वर्षाने केले. पण खास करून अनेक जणांना या वर्षात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांना व्यावसायिक अडचणी आल्या. नोकरी धंद्यात अस्थिरता निर्माण झाली. वाढत्या महागाईमुळे आणि कामकाजाच्या बदलत्या पद्धतीमुळे सामान्य माणसांची प्रचंड गोची झाली. प्रत्येकाने या वर्षात संघर्ष केला. मेहनत घेतली. पण अपयश म्हणजे शेवट नाही हे या वर्षाने शिकवले.
मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता
2025 या वर्षात करिअर सोबतच महत्वाचे वाटले ते म्हणजे मानसिक आरोग्य. या वर्षात मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण झाली. या जगात वाढलेली स्पर्धा, सोशल मीडियावरील तुलना, आपल्यावर असलेल्या अपेक्षांचा भर या सर्वच गोष्टीने मानसिक थकव्याला सामोरे जावे लागले. या वर्षात मनःशांतीला प्राधान्य द्यावे लागले. अनेकांना या वर्षात हृदयविकाराच्या झटक्याचा सामना करावा लागला. त्यामुळे आयुष्य खूप छोटं असून प्रत्येक क्षणाचे महत्व प्रत्येकाला पटले. नात्यांचे मोल देखील या वर्षात अनेकांना पटले. एवढेच नाही तर पैशांपेक्षा नाती महत्वाचे असतात हे देखील या वर्षाला पटवून दिलं.
हे ही वाचा : NEW YEAR 2026 : नवीन वर्षाचे स्वागत करा घरच्या घरी; या सोप्या ट्रिक्सच्या मदतीने
अनेक बदल घडले
2025 या वर्षात अनेक बदल घडले. टेक्नॉलॉजी, कामकाजाची पद्धत, शिक्षण, जीवनशैली, डिजिटल व्यवहार, ऑनलाईन शिक्षण हे आता गरजेचे बनले. यापूर्वी याकडे आपण एक ऑप्शन म्हणून बघत होतो. परंतु या सर्व गोष्टी स्वीकारून स्वतःला अपडेट ठेवणे गरजेचे असल्याचे 2025 ने शिकवले. ज्यांनी हा बदल स्वीकारला ते नक्की पुढे गेले. परंतु ज्यांना हे जमले नाही ते मात्र मागे पडत गेले असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
2026 वर्षात पदार्पण
2025 या सरत्या वर्षाकडे मागे वळून पाहताना फक्त आठवणी नाही तर काही अनुभवही घेतले. या अनुभवांची शिदोरी आपण 2026 या येणाऱ्या नवीन वर्षात देखील सोबत घेऊन चालणार आहोत. हे अनुभवाचे धडे आपल्याला सक्षम आणि संवेदनशील बनवतात. 2025 या वर्षाने आपल्याला परिपूर्ण बनवले नसले तरीही प्रगल्भ, गूढ निश्चयी नक्कीच बनवले आहे. 2026 या वर्षाला आपलेसे करत आपण सर्वांनी आत्मविश्वासाने आणि नवीन ऊर्जेने या वर्षात पदार्पण करूया. सरत्या वर्षाला निरोप देताना आपण येणारे वर्ष सुख समृद्धीचे जावो हि प्रार्थना करूया ! 2025 धन्यवाद ! तू आम्हाला खूप काही शिकण्याची सहन करण्याची इच्छा शक्ती दिली! good byy 2025 – welcome 2026.












