Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • White Discharge: व्हाइट डिस्चार्ज म्हणजे काय? लक्षणे आणि घरगुती सोपे उपाय जाणून घ्या
लाईफस्टाईल

White Discharge: व्हाइट डिस्चार्ज म्हणजे काय? लक्षणे आणि घरगुती सोपे उपाय जाणून घ्या

White Discharge

Symptoms That May Accompany White Discharge: तुम्हालाही हा प्रश्न पडला का व्हाइट डिस्चार्ज म्हणजे नेमकं काय? चला तर आजच्या विशेष लेखात याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

महिलांच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या असतात, पण काही वेळा त्याकडे योग्य लक्ष दिले जात नाही. त्यापैकी एक सामान्य समस्या म्हणजे व्हाइट डिस्चार्ज यालाच ल्यूकोरिया असे ही म्हंटले जाते. ही समस्या सुरू असताना तिच्याकडे दुर्लक्ष केल्यास ती भविष्यात गंभीर अडचणी निर्माण करू शकते. चला पाहूया व्हाइट डिस्चार्ज म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणे आणि घरगुती उपाय काय आहेत.

हेही वाचा: हृदय निरोगी ठेवायचंय? मग रोज करा ही 5 योगासनं अन् मिळवा अनेक फायदे

व्हाइट डिस्चार्ज म्हणजे नेमकं काय?

व्हाइट डिस्चार्ज म्हणजे व्हजायाना मधून पांढरे पाणी किंवा जेलसारखा पदार्थ बाहेर पडणे.
सामान्य परिस्थितीत थोड्या प्रमाणात डिस्चार्ज नैर्सगिक आहे.
परंतु, जर तो जास्त प्रमाणात येतो, वास येतो किंवा रोजच्या आयुष्यात अडचण निर्माण करतो, तर याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः याचा त्रास उन्हाळ्यात जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

प्रमुख लक्षणे कोणती?

व्हाइट डिस्चार्ज जास्त प्रमाणात असल्यास खालील लक्षणे दिसू शकतात:
पोटाच्या खालच्या भागात किंवा कंबरमध्ये वेदना होणे
प्रायव्हेट पार्ट्समध्ये खाज, रॅशेस किंवा इन्फेकशन होणे.
लवकर थकवा, कमजोरी जाणवणे
डिस्चार्जचा अस्वाभाविक रंग किंवा वास येणे.

कारणे

व्हाइट डिस्चार्ज होण्याची काही सामान्य कारणे:

हार्मोनल बदल

बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन

साफसफाईची योग्य काळजी न घेणे

पीरियड्सच्या चक्रात बदल

घरगुती उपाय

1. डाळिंबाची साल

डाळिंबाच्या सालात नैसर्गिक गुणधर्म असतात जे टिश्यू मजबूत करतात आणि व्हजायना हेल्दी ठेवतात. साल धुवून कोरडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे व नंतर नियमित १ ग्लास मध्ये पावडर टाकून ते पाणी प्यावे याने डिस्चार्ज कमी होण्यास मदत होते.

2. योग आणि व्यायाम

भुजंगासन, सेतु बंधासन आणि केगेल एक्सरसाइज योनिमधील रक्तसंचार सुधारतात आणि डिस्चार्ज कमी होण्यास मदत करतात.

3. स्वच्छता आणि आहार

प्रायव्हेट पार्ट्स स्वच्छ ठेवा आणि नितळ कापड वापरा.

दही, लसूण, हळद यांसारखे नैसर्गिक अँटीफंगल व अँटीबॅक्टेरियल पदार्थ आहारात समाविष्ट करा.

4. पाण्याचे प्रमाण वाढवा

शरीरात योग्य प्रमाणात पाणी राहिल्यामुळे विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि संक्रमणाची शक्यता कमी होते.

लक्षात ठेवा

जर डिस्चार्ज जास्त प्रमाणात येत असेल, वास येत असेल किंवा इतर लक्षणे दिसत असतील, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

घरगुती उपाय सुरुवातीस फायद्याचे असू शकतात, पण गंभीर समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.

Kritika Kamra Wedding: अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर कृतिका कामरा अडकली विवाहबंधनात; लग्नाचे रोमँटिक फोटो व्हायरल

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts