Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • हिवाळ्यात व्यायाम करताना घ्या ही काळजी; हा व्यायाम ठरेल फायदेशीर
लाईफस्टाईल

हिवाळ्यात व्यायाम करताना घ्या ही काळजी; हा व्यायाम ठरेल फायदेशीर

Winter workout collage with warm-up, exercise, and jogging

Winter exercise precautions : हिवाळ्यात थंडीमध्ये अनेकांचे प्रचंड हाल होतात. या दिवसात सकाळी प्रचंड प्रमाणात थंडी पडत असल्यामुळे आळस येतो. आणि याच दिवसात रोगप्रतिकारक शक्ति कमी झाल्याने वर्कआउट करणे फायदेशीर असते. परंतु थंडीमुळे अनेकांचे सकाळी उठण्याचे हाल होतात. थंडीच्या दिवसात शरीराचा मेटबॉलीजम नैसर्गिकरित्या वाढतो. जेणेकरून योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. परंतु जर चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यास स्नायू मध्ये ताण येणे, सर्दी, श्वसनसंबंधित अडचणी निर्माण होतात. त्यामुळे हिवाळ्यात व्यायाम करण्याची योग्य पद्धत ठाऊक असणे गरजेचे आहे.

वॉर्म अप

हिवाळ्यात शरीर वॉर्म होण्यास वेळ लागतो. जर तुम्ही जॉगिंग करणार असाल तर सुरुवातीला 10 ते 15 मिनिटे वॉर्म अप करा. त्यासाठी तुम्ही हलके स्ट्रेचिंग, ब्रिस्क वॉक, हाय निज, आर्म सर्कल्स, अँकल स्ट्रेच करू शकतात. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढतो. आणि दुखापत होण्यापासून वाचू शकतात.

जॉगिंग

जॉगिंग करताना सुरुवात हळूहळू करा. हिवाळ्यात शरीरात जास्त स्टिफ असते. शरीर रिलॅक्स झाल्यानंतर तुम्ही जॉगिंगची स्पीड वाढवू शकतात. परंतु तुम्ही सुरुवातीलाच स्पीड वाढवल्यास पिंडरी दुखणे, हॅमस्ट्रिंग वर ताण येणे, श्वसना अडथळा निर्माण होणे यासारख्या अडचणी येऊ शकतात.

पाणी

थंडीच्या दिवसात जास्त पाण्याची तहान लागत नाही. कारण शरीरातील पाण्याचे प्रमाण जशास तसे राहते. तुम्ही थंडीत वर्म ब्रिथिंग केल्यास बॉडी डिहायड्रेट होण्याचे चान्सेस वाढता. त्यामुळे व्यायाम करण्यापूर्वी दोन ते तीन घोट पाणी पिणे आवश्यक आहे.

स्नॅक्स

हिवाळ्यात शारीरिक ऊर्जा जास्त खर्च होते. यामुळे जॉगिंग किंवा वर्कआउट करण्यापूर्वी हलक्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. तुम्ही केली, ओट्स, ड्रायफ्रूट्स, पीनट बटर टोस्ट खाऊ शकतात. जेणेकरून शरीराला त्वरित ऊर्जा मिळेल.

इनडोअर व्यायाम

हिवाळ्यात तुम्ही वर्कआउटला बाहेर जाण्याऐवजी घरातच वर्कआउट करू शकतात. त्यानुसार ट्रेडमिल रन, स्किपींग, बर्पीज, फ्री हँड एक्सरसाईज , योगा, सायकलिंग घरी करू शकतात. जेणेकरून थंडी कमी जाणवेल.

थंड हवेत व्यायाम करणे टाळा

थंडीत हवेचे तापमान जास्त असेल तर तुम्ही व्यायाम करणे टाळू शकतात. कारण अशावेळी व्यायामामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts