Changes in Mumbai University examination schedule : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CMAjit Pawar Death) यांच्या अकाली निधनामुळे राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या (District Council and Panchayat Samiti elections) तारखा दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे मुंबई विद्यापीठाला (Mumbai University) देखील आपल्या नियोजित वेळापत्रकात बदल (Changes in exam dates) करावा लागला. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार ९ आणि १० तारखेला होणारे पेपर आता फेब्रुवारीच्या शेवटच्या (New exam dates announced) आठवड्यात म्हणजेच २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी (The exams will be held on February 24th and 25th) घेण्यात येणार आहेत.
दरम्यान, परीक्षेची तारीख जरी बदलण्यात आली असली तरी बाकी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आधीच्या वेळापत्रकात जी वेळ दिली होती, त्यानुसारच २४ व २५ तारखेला परीक्षा घेण्यात येतील, असे परीक्षा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. खरंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होऊन ७ तारखेला मतमोजणी करण्यात येणार होती. मात्र, गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार याचे अपघाती निधन झाले. त्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या शासकीय दुखवट्यामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रम आणि परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.
महाविद्यालयांनी वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी
पर्यायाने मुंबई विद्यापीठानेही आधी ९ फेब्रुवारी आणि १० फेब्रुवारी रोजी नियोजित असलेल्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सर्व संबंधित महाविद्यालयांनी या सुधारित वेळापत्रकाची माहिती तातडीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी असे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. परीक्षेच्या ऐन वेळी विद्यार्थ्यांची ओढाताण होऊ नये आणि संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
याआधीही वेळापत्रकात बदल
दरम्यान यापूर्वी महापालिका निवडणुकांमुळेही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. 14 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान होणाऱ्या परीक्षाही विद्यापीठाला पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. त्या परीक्षा 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारीदरम्यान घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाने मागील महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता जाहीर केल्यावर विद्यापीठाने आधी नियोजित केलेल्या 5 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. या परीक्षा 17, 18 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारी होणार आहेत. तसेच विद्यापीठाने बुधवारी, 28 जानेवारीला दुपारच्या सत्राती होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्या परीक्षा 3 फेब्रुवारीला दुपारी 2:30 ते 4:30 या वेळेदरम्यान घेतल्या जातील.









