Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • अशोक खरात प्रकरणामुळे NCP च्या अडचणीत वाढ? रुपाली चाकणकर यांचे महिला अध्यक्ष पदही धोक्यात?
ताज्या बातम्या

अशोक खरात प्रकरणामुळे NCP च्या अडचणीत वाढ? रुपाली चाकणकर यांचे महिला अध्यक्ष पदही धोक्यात?

kharat and chakankar

ashok kharat and rupali chakankar case : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नाशिकमधील पाखंडी ज्योतिषी अशोक खरात (ashok kharat) प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपांनंतर आता नरबळी, जबरदस्ती गर्भपात, तसेच प्रचंड संपत्ती जमवल्याचे आरोपही पुढे आले आहेत. या पार्श्वभूमीवर अशोक खरातशी जवळीक असल्याच्या चर्चेमुळे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर कारवाई होणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधकांसह NCP चे काही आमदारही रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत आहेत. देवनगरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तेव्हापासून चाकणकर यांच्या NCP महाराष्ट्र महिला अध्यक्ष पदावर टांगती तलवार आहे.

हे ही वाचा:भाजपा नेत्याच्या मुलाकडून 30 मुलींचं शोषण, सेक्स स्कँडलनं गोवा हादरलं

सुनेत्रा पवार यांच्याकडे सर्वांचे लक्ष

सूत्रांच्या माहितीनुसार, NCP च्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यायचा की नाही, याचा अंतिम निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार घेणार आहेत. त्यामुळे सध्या सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे.

नरहरी झिरवळ यांचा एका किन्नरासोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ

दरम्यान, NCP नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांचा एका किन्नरासोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्याने पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशोक खरातसोबतचे फोटो आणि पाय धुतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी 20 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या फारशा सक्रिय दिसत नाहीत आणि सोशल मीडियावरही त्यांची उपस्थिती कमी झाली आहे.

अशोक खरात प्रकरणातील घडामोडी

18 मार्च: नाशिक पोलिसांनी 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून अशोक खरात याला अटक केली. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल.

19 मार्च: त्याच्याकडून महिलांचे सुमारे 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त.

20 मार्च: खरातशी संबंधांच्या वादानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

21 मार्च: प्रकरणाच्या गांभीर्यामुळे SIT स्थापन; नेतृत्व वरिष्ठ IPS अधिकारी तेजस्वी सातपुते करत आहेत.

23 मार्च: आणखी 2 FIR दाखल; एका गर्भवती महिलेच्या शोषणाचा समावेश.

24 मार्च: नाशिक न्यायालयाने पोलिस कोठडी 29 मार्चपर्यंत वाढवली; 5 नरबळींचा संशय.

26 मार्च: एकूण 8 FIR दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की IT विभाग त्याच्या मालमत्तेची आणि परदेश दौऱ्यांची चौकशी करत आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts