Dhanteras 2025: दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. आज धनत्रयोदशी असून आज माता महालक्ष्मी, कुबेर देवता आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे. दरवर्षी अश्विन महिन्याच्या वद्य त्रयोदशीच्या तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवसाला धनतेरस असंही म्हंटल जातं. त्यानुसार आज या दिवसाचे महत्व जास्त आहे. जाणून घ्या कशी करावी धनत्रयोदशीची पूजा:
या पद्धतीने करा धनत्रयोदशीची पूजा
सर्व प्रथम ब्रम्हमुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा. आणि स्वच्छ आणि पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करा. त्यानंतर पूजा स्थळ सजवा, त्यासाठी चौरंगावर पिवळ्या वस्त्राचे आसन अंथरून त्यावर स्वस्तिक काढा. त्यानंतर लक्ष्मीमाता भगवान धन्वंतरी आणि कुबेर देवतेची प्रतिमा किंवा मूर्ती चौरंगावर स्थापन करा. तांदळावर तेल किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करा. देवतांना जल, हळद कुंकू, फळे, फुले, मिठाई आणि धने गुळ अर्पण करा. त्यानंतर लक्ष्मीमातेची आणि धन्वंतरी देवतेची आरती करा. आणि मंत्र जप करून प्रसादाचे वाटप करा.
View this post on Instagram
धनत्रयोदशीची पूजा करण्यासाठी तिथी आणि शुभ मुहूर्त
तिथी प्रारंभ: 18 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12:18 वाजता
तिथी समाप्त: 19 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1:51 वाजता
प्रदोष काळ: 18 ऑक्टोबर संध्याकाळी 6:13 ते रात्री 8:41 वाजेपर्यंत
सूर्यास्त: संध्याकाळी 5:57 वाजता
View this post on Instagram
धनलक्ष्मीस्तोत्र पठण
धनत्रयोदशीला धनलक्ष्मी स्तोत्र पठण केल्याने लक्ष्मीदेवी प्रसन्न होते. घरातील आर्थिक अडचणी कमी होतात आणि नवे मार्ग खुलतात. आरोग्य आणि संपत्ती दोन्ही लाभते. वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, आणि शुभता वाढते. यंदाच्या
धनत्रयोदशीला लक्ष्मीदेवी तुमच्या घरावर कृपादृष्टी ठेवो, आरोग्य, आनंद आणि समृद्धी लाभो, आमच्या लोकशिवायच्या वतीने तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! ”