आज सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घ्या असा स्पष्ट आदेश दिला आहे. राज्यात गेल्या काही काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. याप्रकरणी आता महत्त्वाची अपडेट मिळाली आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी पार पडली. या दरम्यान न्यायालयाने निवडणुका घेण्यासाठी शेवटची तारीख दिली आहे. त्यानुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत या निवडणुका घेण्याचे न्यायालयाने म्हंटले आहे. म्हणून राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यासाठी 4 महिन्याच कालावधी देण्यात आला होता. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात दिला होता. परंतु पावसामुळे आणि काही कारणामुळे होऊ शकल्या नाहीत. यामागे आणखी एक कारण देखील होते, ते म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित निकाल. त्यामुळे 2022 पासून या निवडणुका रखडलेल्या आहेत. आता याप्रकरणी न्यायालयाने निवडणूक घेण्याचे अंतिम आदेश दिले आहेत. म्हणून लवकरच चार महिन्यात या निवडणुका पार पडतील.
निवडणुकांना चार महिन्यांची मुदत संपल्यावर अर्ज दाखल केल्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त करत कोर्टाने आज निवडणुकीसाठी स्पष्ट वेळापत्रक बनवून दिले. तसेच यावेळी न्यायालयाने चार महिन्यात निवडणूका का घेण्यात आल्या नाही याबद्दल विचारल्यावर EVM ची कमी, बोर्ड परीक्षा आणि स्टाफची कमी असल्याचे कारण दिले. यावर कोर्टाने बोर्ड परीक्षेचं कारण फेटाळून लावत दोन कारणासाठी सूचना दिल्या. तसेच प्रभाग रचनेबाबत 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदत दिली तर नोव्हेंबर महिन्यात EVM पूर्णत्वास आणण्याबाबत सांगितलं.