local body elections in Maharashtra : काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा करण्यात आली. या निवडणुकांच्या तारख्या जाहीर करण्यात आल्या. परंतु आता यावर राजकीय पक्षात विरोधकांमध्ये हालचाल पाहायला मिळत आहे. विरोधकांनी राजकीय पक्ष एकमेकांविरोधात आरोप लावत असून वातावरण राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
तिन्ही प्रश्न एकत्र लढणार ?
निवडणुकांची घोषणा झाली असून आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. त्या अनुषंगाने तिन्ही पक्ष आपापल्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील. परंतु कुठल्याही परिस्थितीत आम्ही तिघं एकत्रच आहोत. कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्ट पण युती होईल. म्हणून मला असं वाटतं की नगरपालिकांच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल. असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
हे हि वाचा : उद्धव ठाकरे ५ नोव्हेंबरपासून मराठवाडा दौऱ्यावर, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मांडणार ऐरणीवर
उद्धव ठाकरे पहिल्यांदा बाहेर पडल्याचा आनंद
आज पासून उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी दगा बाजरी अशी सरकार विरोधात मोहिमेचा आरंभ केला आहे. कर्जमाफी दूरच पण मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत देखील मिळाली नसल्याचा उद्धव ठाकरे म्हणालेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा उत्तर दिलय. ते म्हणालेत की पहिल्यांदा उद्धव ठाकरे बाहेर पडल्यास मला आनंद आहे. उद्धव ठाकरे हे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही विकासावर त्यांचे भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा असा टोला देखील उद्धव ठाकरे वर लगावण्यात आला आहे.
हे हि वाचा : नगरपालिका, नगरपंचायत निवडणूकीचे बिगूल वाजले, 2 डिसेंबरला मतदान 3 ला मतमोजणी
विरोधकांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत असून यावर आणि सरकार विरोधातील उद्धव ठाकरेंच्या संवाद दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की निवडणुका पुढे ढकलण्यात असेच अपेक्षित उत्तर उद्धव ठाकरे यांना हवे आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे ढकलने अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राच्या जनतेचा कौल महायुतीलाच मिळणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी समाज माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. (local body elections in Maharashtra)











