Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • नगरपालिका, नगरपंचायत निवडणूकीचे बिगूल वाजले, 2 डिसेंबरला मतदान 3 ला मतमोजणी
Top News

नगरपालिका, नगरपंचायत निवडणूकीचे बिगूल वाजले, 2 डिसेंबरला मतदान 3 ला मतमोजणी

website 15

राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणूकीचे बिगूल बाजले आहेत. 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर केले जाणार आहे. याबाबत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत अधिकृत घोषणा केली आहे. राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी हा निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

2 डिसेंबरला मतदान 3 ला मतमोजणी

निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, नगर परिषद आणि नगर पंचायती संबंधित माहिती देणार आहोत. 246 नगर परिषदांमध्ये 10 नवीन नगर परिषद समावेश आहे. 42 नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येणार आहे. 15 नवनिर्मित नगरपंचायती आहेत. 7 नोव्हेंबर रोजी मतदार याद्या प्रसिद्ध होतील. तर 10 नोव्हेंबरपासून उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. 17 नोव्हेंबर ही अर्ज दाखल करायची अंतिम मुदत असेल. तर 18 नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी केली जाईल. तर 25 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल. 2 डिसेंबर रोजी मतदान होईल तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी निकाल हाती येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – Local body Elections : आज निवडणुकीचे बिगूल वाजणार! ‘मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थां’च्या निवडणुकीची घोषणा होणार

निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सद्वारे होणार

‘नगर परिषदची निवडणूक बहुसदस्य पद्धतीने 288 अध्यक्ष निवडले जाणार आहेत. नगर परिषदेच्या एक वार्डमध्ये दोन किंवा 3 जागा असणार आहेत. या निवडणुकीसाठी 1 कोटी 7 लाख 30 हजार 576 एवढे मतदार असणार आहेत. निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सद्वारे होणार आहे. तसेच मोबाईल अॅपमधून मतदार आपलं नाव शोधू शकतात, असं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेम्हणाले.

कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम ?

अर्ज दाखल १० नोव्हेंबर

अंतिम तारीख १७ नोव्हेंबर

छाननी – १८ नोव्हेंबर

माघारी घेण्याची मुदत – २५ नोव्हेंबर

निवडणूक चिन्ह नेमूण देणं – २६ नोव्हेंबर

मतदान – २ डिसेंबर २०२५

मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts