• Home
  • देश
  • राहुल गांधी व्हिएतनामला का गेले? परतल्यानंतर सत्ता बदल होणार?
राजकारण

राहुल गांधी व्हिएतनामला का गेले? परतल्यानंतर सत्ता बदल होणार?

Rahul Gandhi Vietnam
15

Rahul Gandhi Vietnam: राहुल गांधी व्हिएतनामच्या दौऱ्यावर गेले आहेत…तिथून परत आल्यानंतर देशात सत्ता बदल होणार, असल्याची चर्चा देशभरात सुरू आहे…यातच खासदार संजय राऊतांनी देखील दावा केलाय की देशात सत्ता बदल होईल.. .राहुल गांधी व्हिएतनामला गेले आहेत ना, परत आल्यावर बघा…तसंच भाजपमध्ये देखील चर्चा सुरू आहे की देशात सत्ता बदल होणार आहे…राहुल गांधींच्या व्हिएतनामच्या दौऱ्याबाबत काँग्रेसने कमालीची गुप्तता पाळली आहे…

काँग्रेसने राहुल गांधींच्या दौऱ्याबाबत कुणालाही माहिती दिलेली नाही…सध्या देशात एवढा गदारोळ सुरू असताना काँग्रेस शांत पाहायला मिळत आहे…चंद्राबाबू नायडू देखील काँग्रेस मुख्यमंत्र्‍यांच्या संपर्कात पाहायला मिळत आहे…एकनाथ शिंदे नाराज पाहायला मिळत आहे… त्यामुळे खरंच देशात सत्ता बदल होणार की काय? असा प्रश्न निर्माण झालाय….पाहूयात की देशात खरंच सत्ता बदल होणार का? सत्ता बदलसाठी काँग्रेसला कोण मदत करत आहे? भाजपसोबत सत्तेत असलेले पक्ष काँग्रेस सोबत जाणार का?

राहुल गांधींचा व्हिएतनाम दौरा (Rahul Gandhi Vietnam)

भारताचे शेजारील देश नेपाळ आणि बांगलादेशमध्ये सत्ता बदल पाहायला मिळाली…बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना तर भारतात पळून यावं लागलं…आता भारतात देखील सत्ता बदल होणार असल्याची चर्चा सुरू आहे…राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या व्हिएतनामच्या दौऱ्यावर गेले आहेत…याबाबत काँग्रेसकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे…मात्र भाजपच्या काही सोर्सने त्यांचा विमानातील एक व्हिडिओ समोर आणल्याची चर्चा आहे…देशात निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत…. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी वातावरण तापलेले असताना अशा परिस्थितीत राहुल गांधी परदेशात गेल्याने अनेक प्रश्न आता निर्माण होत आहे…भाजपकडून राहुल गांधींच्या दौऱ्यावर टीका करण्यात येत आहे… मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या खासगी दौऱ्याचं समर्थन केलंय.. राहुल गांधी कुठे जातात, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याची भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी मांडलीय… पण राहुल गांधींच्या दौऱ्याबाबत सविस्तर अधिकृत माहिती सार्वजनिक झालेली नसल्यामुळे राजकीय चर्चांना वाव मिळतोय… अर्थात हा दौरा सत्ताबदलाच्या कोणत्याही गुप्त मोहिमेचा भाग तर नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे…सत्ता बदलवरून संशय निर्माण झालेला असताना खासदार संजय राऊतांनी रिजीम चेंज होऊन जाईल…तुम्ही पाहत राहा… राहुल गांधी (Rahul Gandhi) व्हिएतनामला गेले आहेत ना, परत आल्यावर बघा, असं म्हणत या चर्चेला हवा दिली आहे…

आता संजय राऊतांनी केलेल्या विधानाचा अर्थ समजून घेण्यासाठी केंद्रातील सत्तेचं गणित समजून घ्यावं लागेल.. कारण २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची परिस्थिती वेगळी झाली होती… २०१४ मध्ये भाजपला स्वबळावर बहुमत मिळालं होतं… २०१९ मध्येही भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली होती… मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २४० जागांवर समाधान मानावं लागलं… लोकसभेत बहुमतासाठी २७२ खासदारांचा पाठिंबा आवश्यक असतो… त्यामुळे भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांची मदत घ्यावी लागली. तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार यांच्या पाठिंब्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं…

हेही वाचा : बिश्नोई अस्तित्त्वात नाही अमित शहाच लॉरेन्स बिश्नोई आहेत? संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या भूमिकेकडे लक्ष

आता सध्या चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) काँग्रेसचे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या संपर्कात पाहायला मिळत आहे…नायडू यांनी अनेकवेळा रेवंत रेड्डी यांची भेट घेतल्याची माहिती आहे…त्यामुळे वेळ पडली तर चंद्राबाबू नायडू काँग्रेससोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे…आता राहिला प्रश्न नितीश कुमार यांचा…बिहारमध्ये भाजपने नितीश कुमार यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवली…या ठिकाणी मोठा विजयही मिळाला…नितीश कुमारांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि काही महिन्यातच भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर केलं आहे…त्यांना भाजप केंद्रात मंत्रीपद देणार अशी चर्चा होती…मात्र भाजपने अद्याप नितीश कुमार यांना कोणतंही मंत्रीपद दिलेलं नाही…त्यामुळे ते भाजपसोबत नाराज असल्याची चर्चा आहे….सध्या तेलुगू देसम पक्षाचे 16 जागा खासदार आणि जनता दल युनायटेडला १२ खासदार आहेत…दोन्ही नेत्यांनी भूमिका बदलली तर NDA तील 28 खासदार कमी होऊ शकतात…

तसंच सध्या NDA मध्ये एकनाथ शिंदे देखील कमालीचे नाराज असल्याची चर्चा आहे….यातच भाजपने सोलापुरात शिंदे गटाला मोठा धक्का देत शिंदेंच्या पाच नगरसेवकांसह 200 पदाधिकारी फोडले आहेत…पहिलेच शिंदेंना प्रत्येक निवडणुकीत जागावाटपासाठी वाटाघाटी करावी लागत आहे…त्यांना काही महिन्यानंतर मुख्यमंत्री पद देऊ असं आश्वासन भाजपने दिलं होतं, अशी माहिती आहे…पण भाजपकडून त्यांना काहीच मिळाले नाही, अशी चर्चा आहे…यामुळे जर गरज पडली तर एकनाथ शिंदे आपली भूमिका बदलू शकतात, असं म्हटलं जात आहे…जर शिंदेंनी भूमिका बदलली तर 13 खासदारांचा पाठिंबा कमी होऊ शकतो…

हेही वाचा : ठाकरे VS शिंदे: दसरा मेळाव्यात शेतकरी मदतीवरून आरोप-प्रत्यारोप! दसरा मेळाव्या मध्ये नेमकं काय घडलं?

खरंच भारतात सत्ता बदल होऊ शकतो का?

टीमसीमधून फूटून भाजपसोबत आलेले खासदार देखील भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे…या खासदारांना लोकसभा अध्य़क्ष ओम बिर्ला यांनी नोटीस बजावली आहे…यामुळे या खासदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे…त्यामुळेच वेळ पडली तर हे खासदार परत ममता बॅनर्जी यांच्याकडे म्हणजेच इंडिया आघाडीत जाऊ शकतात.. …बिहारमधील भाजपचे अत्यंत जवळचे समजले जाणारे आणि पीएम मोदींचे हनुमान म्हणून प्रसिद्ध असलेले चिराग पासवान देखील सध्या नाराज पाहायला मिळत आहे…त्यांनी तरूणांच्या आंदोलनावरून भाजपलाच घरचा आहेर दिला होता…तसंच त्यांचं बिहारमधील भाजप सरकारसोबत जास्त जूळत नसल्याची चर्चा आहे…यामुळे ते देखील वेळ पडली तर भाजपची साथ सोडण्याची शक्यता आहे…

काँग्रेस सध्या भाजपला 240 वर आणण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे…जर भाजप 240 वर आली तर केंद्रातील त्यांची सत्ता कोसळू शकते…त्यामुळे काँग्रेस सध्या भाजपला आपल्या मूळ आकड्यावर आणण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे…जर वरील सर्व पक्षांनी भाजपची साथ सोडली तर भाजपकडे 252 खासदारांचा पाठिंबा उरतो…पण जे छोटे पक्ष आहेत…ज्यांचे एक किंवा दोन खासदार आहेत…ते नेहमीच सत्तेच्या बाजूला पाहायला मिळतात….त्यामुळे छोटे पक्ष देखील आपला पाठिंबा इंडिया आघाडीला देण्याची शक्यता आहे…यामुळेच देशात सत्ता बदल हा शब्द चांगलाच चर्चेत पाहायला मिळत आहे…

राजकीय इतिहास पाहिला तर नितीश कुमार यांनी यापूर्वी भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत बिहारमध्ये सरकार स्थापन केलं होतं… त्यानंतर ते पुन्हा भाजपसोबत गेले… दुसरीकडे चंद्राबाबू नायडू यांनीही यापूर्वी भाजपपासून फारकत घेतली होती… त्यामुळे भारतीय राजकारणात आघाड्या बदलणं ही नवीन गोष्ट नाही… . काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी चंद्राबाबू नायडू, एकनाथ शिंदे आणि जनता दल युनायटेड यांच्यासारखे मित्रपक्ष भाजपसोबत किती काळ राहणार, असा सवाल उपस्थित केला होता…यामुळे आता राहुल गांधी व्हिएतनामच्या दौऱ्यावर परत आले तर खरंच सत्ता बदल होणार का? हे पाहणं महत्त्वांचं ठरणार आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts