Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • मालेगावच्या शिरपेचात मानात तुरा, युपीएससी परीक्षेत शेतकऱ्याच्या लेकीला घवघवीत यश
ताज्या बातम्या

मालेगावच्या शिरपेचात मानात तुरा, युपीएससी परीक्षेत शेतकऱ्याच्या लेकीला घवघवीत यश

Passed UPSC exam

Passed UPSC exam : निसर्गाचा असहकार, केंद्र आणि राज्य सरकारची शेती विषयक धरसोड धोरण आणि महागाईचा आगडोंब त्यातच शेतीमालाला उत्पादित शेतीमालाला मिळणारा अत्यल्प भाव. या सर्व बाबींमुळे बळीराजा कमालीचा हैराण आणि त्रस्त झालेला असताना आपल्या माता-पितांनी केलेले कष्ट आणि शेतात राबवून घेतलेली मेहनत याची जाणीव ठेवत नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील शेतकरी कन्येने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत घवघवीत यश मिळवून शेतकऱ्यांची मुले ही मागे नाहीत याची प्रचिती मिळवून दिली.

हेही वाचा – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे विशेष कार्यक्रम

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेच्या निकालात मालेगाव तालुक्याने यंदा उल्लेखनीय यश मिळवले असून चार विद्यार्थ्यांनी देशपातळीवर यश मिळवत तालुक्याचा मान उंचावला आहे. सोयगावचा कार्तिक बच्छाव (१७७), पाटणेची धनश्री अहिरे (४८९), कळवाडीची प्रेरणा खवळे (९१३) आणि मालेगाव कॅम्पचा अनिकेत अहिरे (९४०) यांनी यश मिळवत मालेगावच्या शैक्षणिक क्षमतेची चमक देशभर दाखवून दिली.

यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत शेतकऱ्याच्या लेकीला यश

यात माळमाथा भागातील कळवाडी येथील शेतकरी कैलास खवळे आणि सुनिता खवळे यांची कन्या प्रेरणा खवळे हिने देशात ९१३ वा क्रमांक मिळवत यश संपादन केलं.  अवर्षणप्रवण आणि ग्रामीण भागातून येऊन यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत यश मिळवणारी ती भागातील पहिली माळमाथा ‘शेतकऱ्याची लेक’ ठरली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जीवनाला प्रेरणा देणारी कहाणी

कोणतीही गोष्ट साध्य होते ती अपार मेहनतीने. सोशल मीडियापासून तुम्ही दूर राहून. अभूतपूर्व यश मिळवू शकता. सातत्य ,मेहनत, चिकाटी आणि आपल्या मातापित्यांनी घेतलेले कष्ट याची जाणीव ठेवत या शेतकरी मुला-मुलींनी मिळवलेले यश शहरी आणि निमशहरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जीवनाला प्रेरणा देणारी बाब ठरणार आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts