Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • आनंदाची बातमी…लाडक्या बहिणींसाठी ! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज दुरुस्ती अन् ई-केवायसी
ताज्या बातम्या

आनंदाची बातमी…लाडक्या बहिणींसाठी ! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज दुरुस्ती अन् ई-केवायसी

ladki bahin

ladki bahin yojana : काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणीच्या (ladki bahin) खात्यात हप्ते पडत नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणी हिरमुसल्या होत्या. परंतु आता सरकारने लाडक्या बहिणीसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. तांत्रिक कारणांमुळे रखडलेले हप्ते (Pending Installments) लवकरच मिळणार आहेत. त्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत अर्ज दुरुस्ती अन् ई-केवायसी (e-KYC) करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यात हप्ते जमा होण्यास मदत होणार आहे.

हे ही वाचा: चिअर्सSsss…आता पेट्रोल पंपावर दारुही..!

ई-केवायसी करताना चूक

योजनेच्या सुरुवातीला अर्ज भरताना सुरवातीला घाई गडबड करण्यात आली. महिलांनी ई-केवायसी करताना चूक केली. चुकीचे पर्याय निवडल्याने ‘नाही’ ऐवजी ‘हो’ अशा तांत्रिक मुद्दे उपस्थित झाले. त्यामुळे अनेक पात्र अर्ज नाकारले होते. या तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आली आहे. परिणामी माहिती अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाने अंतिम मुदतवाढ दिली आहे.

त्या महिलांना अर्ज दुरुस्तीची संधी

ज्यांचे अर्ज मंजूर आहेत, पण खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही.ज्यांच्या बँक खात्याच्या माहितीत त्रुटी आहेत. ज्यांनी अद्याप आधार कार्डचे प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही. ज्यांचे बँक खाते डीबीटी (DBT) साठी लिंक किंवा सक्रिय नाही अशा लाभार्थी महिलांना अर्ज दुरुस्तीची संधी मिळणार आहे.

पुढील सर्व लाभ महिलांच्या खात्यात जमा

अनेक महिलांच्या आधार कार्डवरील नाव आणि बँक पासबुकवरील नाव यात तफावत असल्याने त्यांचे हप्ते रखडले होते. आता ३१ मार्चपर्यंत ही दुरुस्ती केल्यास, रखडलेल्या थकीत हप्त्यांसह पुढील सर्व लाभ महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts