गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई येथील मोनोरेल पावसात तांत्रिक बिघाडामुळे अचानक बंद पडली होती. ही घटना महिन्यात दोन वेळेस घडल्यामुळे तसेच पुन्हा या घटनेचा सामना करावा लागू नये म्हणून एमएमआरडी ने मोनोरेल सेवा तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात कामावर जाणाऱ्या प्रवाशांची सकाळच्या वेळेस प्रचंड गर्दी असते. पावसाळ्यात बस सेवा आणि लोकल सेवा विस्कळीत झाल्यास प्रवाश्यांचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे लोकल आणि बस सेवेला पर्याय म्हणून मोनोरेल सेवा सर्वांसाठी उपयुक्त आणि फायदेशीर ठरते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी महिन्यात दोन वेळेस ही मोनोरेल अचानक बंद पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. यावर आता एमएमआरडी ने महत्वपूर्ण निर्णय घेऊन तात्पुरत्या स्वरूपात ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्लॉक वेळी करण्यात येणार ही कामे
ही मोनोरेल सेवा 20 सप्टेंबर पर्यंत बंद असणार आहे. मोनोरेल बंद करण्यात आल्यानंतर ब्लॉक काळात मोनोरेल संदर्भात तांत्रिक कामे पूर्ण करून भविष्यातील गती योग्यरित्या होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच नवीन गाड्यांनाही गती मिळावी यासाठी CBTC सिग्नलिंग प्रणाली अपग्रेड करण्यात येणार आहे. सध्या या गाड्यांची डागडुजी करण्याचे काम सुरु असून मोनोरेल सुरु झाल्यानंतर प्रवाशांना सुरक्षित आणि निर्धास्तपणे वाहतूक करण्यात येणार आहे.
दोन वेळेस मोनोरेल पडली बंद
ऑगस्ट महिन्यात 19 तारखेला प्रचंड पाऊस पडल्यामुळे सायंकाळी 6.15 च्या सुमारास म्हैसूर कॉलनी जवळ मोनोरेल अडकल्याची घटना घडली होती. या मोनोरेलमध्ये 582 पेक्षा जास्त अधिक प्रवासी दोन ते तीन तास अडकले होते. यावेळी रेक्स्यु ऑपरेशन करून अग्निशमन दलाने त्यांची सुटका केली होती. तर काही दिवसांपूर्वी आचार्य अत्रे नगर स्थानकात आणखी एक मोनोरेल अडकली होती. यावेळी रेस्क्यू करत 200 प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले होते.
हे कामे सुरु
या मोनोरेल मध्ये हैद्राबाद येथे विकसित करण्यात आलेली कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टीम CBTC या मार्गावर पहिल्यांदा बसविण्यात येणार आहे. ३२ जागांवर ५ इलेक्ट्रोनिक इंटरलॉकिंग बसवण्यात आले असून सध्या याची चाचणी सुरु आहे.
10 नवीन गाड्या खरेदी
एमएमआरडीने मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत मेधा कंपनीने SMH Rail च्या साहाय्याने तयार केलेल्या 10 नव्या गाड्या खरेदी केल्या असून त्यापैकी 8 गाड्या उपलब्ध करण्यात आल्या असून एका गाडीचे इन्स्पेक्शन सुरु आहे. तर एका गाडीची निर्मिती अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.