Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • मुंबईत प्रदूषण वाढले; आरएमसी प्लांटच्या तपासणीसाठी विशेष पथक स्थापित
Mumbai

मुंबईत प्रदूषण वाढले; आरएमसी प्लांटच्या तपासणीसाठी विशेष पथक स्थापित

Maharashtra Pollution Control Board officials inspecting an RMC plant in Mumbai

MPCB inspection RMC plants Mumbai : मुंबई शहरातील हवा प्रदूषण नियंत्रणाकरिता विविध उपायोजना केल्या जात असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील आरएमसी प्लांटची तपासणी करण्याकरता विशेष तपास पथके स्थापन केली आहेत.

शहरातील हवा प्रदूषण नियंत्रणाकरिता घेतलेल्या विशेष आढावा बैठकीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धेश कदम व सदस्य सचिव एम देवेंदर सिंह यांनी घेतलेल्या आढाव्यानुसार मुंबई शहरातील जेआरएमसी प्लांट नामनिर्देशित नियमांचे पालन करत नसतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

हे ही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर; पहाटेच चहाचा आस्वाद घेत विकासकामांची पाहणी

चार आस्थापनांवर बंदची कारवाई

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई शहरासाठी चार विशेष तपास पथके तर नवी मुंबई शहरासाठी दोन विशेष तपास पथके स्थापन केली आहेत. ही विशेष तपास पथके शहरातील आरएमसी प्लांट ना भेट देऊन त्यांची तपासणी करणार आहेत. यामध्ये नियमांचे उल्लंघन आढळून येणाऱ्या प्लांटला कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवा प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या शहरातील चार आस्थापनांवर बंदची कारवाई केली असून एकूण 37 आरएमसी प्लांट यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडून एक कोटी 87 लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

भरारी पथके तात्काळ तपासणीला सुरुवात करणार

शहरातील हवा प्रदूषण नियंत्रण करिता महानगरपालिकेच्या बरोबरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील आता धडक मोहीम हाती घेतली असून हवेची गुणवत्ता राखण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील आणि कठोर प्रसंगी कारवाई देखील केली जाईल असे प्रतिपादन अध्यक्ष श्री सिद्धेश कदम यांनी केले आहे. शहरातील हवेच्या गुणवत्तेचा दैनंदिन आढावा घेतला जात असून या करिता आस्थापनांना घालून दिलेल्या अटींचे पालन होते की नाही याची तपासणी करण्यासाठी ही भरारी पथके तात्काळ तपासणीला सुरुवात करणार असल्याचं मंडळाचे सदस्य सचिव एम देवेंदर सिंह यांनी म्हटल आहे.

मुंबई शहरात 14 केंद्रे कार्यरत

मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रात सतत हवा गुणवत्ता मोजमापन करणारी एकूण 32 केंद्रे असून मुंबई शहरात 14 केंद्रे कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त मोजमापन करणाऱ्या 22 मोबाईल व्हॅन उपलब्ध असून गरजेनुसार ज्या ज्या ठिकाणी हवेचे गुणवत्ता ढासळली जाते त्या ठिकाणी त्याचे तात्काळ मोजमापन या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून केले जात आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts