मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील ओला उबेर ऍप आधारित कॅब, टॅक्सी आणि रिक्षा चालकांचे भाववाढीवर वेगवेगवेगळ्या शहरात आंदोलन सुरु आहे. आता थेट या ओला उबेर चालकांनी गुरुवारी संप पुकारला आहे. त्यामुळे ओला उबेरचा वापर करणाऱ्या प्रवाशांना फटका बसू शकतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध लोकार्पण कार्यक्रमांसाठी मुंबई येथे येणार आहेत. त्यानुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी भारतीय गिग कामगार मंचाने गुरुवारी, 9 ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून एक दिवसीय बंद ची हाक दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील वित्त विषयाचे तज्ज्ञ व्यक्ती देखील मुंबईत येणार आहे. परिवहन विभागाच्या अस्थाव्यस्थ कारभाराकडे आणि ऍप आधारित ओला उबेर चालकांच्या आर्थिक समस्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी बंद पुकारण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत भारतीय गिग कामगार मंचाचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी माहिती दिली.
या आहे आंदोलकांच्या मागण्या
ऍप आधारित ओला उबेर यासारख्या कॅब, रिक्षा चालकांनी विविध मागण्या आंदोलनात समोर ठेवल्या आहेत. त्यामध्ये राज्य परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ॲग्रीगेटर्सवर कठोर कारवाई करणे, चालकांना योग्य वेतन आणि विमा लाभ मिळवून देणे, अँप कंपन्यांकडून पारदर्शक भाडे संरचना लागू करावी. ॲप कंपन्यांकडून मनमानीपणे चालकांची खाती निलंबित करणे थांबवावे या मागण्या आंदोलनात ठेवण्यात येत आहे. तसेच वाढलेला इंधन आणि देखभाल खर्च यामध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे.
यापूर्वी 30 सप्टेंबर रोजी ऍप आधारित ओला उबेर रिक्षा चालक यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजूनही यावर तोडगा न निघाल्याने आता चालकांमध्ये संताप व्यक्त











