School initiative : रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. पोलादपूर तालुक्यातील सडवली शाळेत (Sadavali School initiativ) देखील शाळेच्या मुख्यमंत्री पदासाठी (School Chief Minister election) थेट ईव्हीएम मशीनद्वारे (EVM voting in school) मतदान प्रक्रिया पार पडली. रुद्र नांदे या विद्यार्थ्याच्या संकल्पनेतून ईव्हीएम (student election process) मशीन तयार केली. या ईव्हीएम मशीनद्वारे मतदान प्रक्रिया सडवली (innovative school activity) शाळेत पार पडली.
विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी शाळेच्या मुख्यमंत्रीपदासाठी थेट मशीन व बॅलेट पेपर या दोघांमधूनही मतदान प्रक्रिया मंगळवार 24 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडली. शाळेच्या मुख्यमंत्री पदासाठी असलेले उमेदवार ( student leadership program) रुद्र नांदे व तनिष्का जगताप यांनी शाळेमध्ये प्रचार केला. पॅम्प्लेट द्वारे जाहीरनामा प्रकाशित केला. विद्यार्थ्यांची सभा घेतली व सभेतून जाहीर भाषणे केली. शाळेतून प्रचार फेरी देखील (democracy in school) काढण्यात आली. मतदानाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांच्या मतदार याद्या फलकावर प्रकाशित करण्यात आल्या. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया रुद्र नांदे या विद्यार्थ्याने बनविलेल्या ईव्हीएम मशीनद्वारे व बॅलेट पेपर (civic education initiative) या दोघांच्याही माध्यमातून पार पडली.
ईव्हीएम मशीन व बॅलेट पेपर यांचा निकाल जाहीर
दोन्ही उमेदवाराकडून उमेदवार प्रतिनिधी मतदान केंद्रात बसविण्यात आले. मतदानाच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री आखाडे यांनी काम पाहिले. दुपारी साडेबारा वाजता ईव्हीएम मशीन व बॅलेट पेपर यांचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात तनिष्का जगताप ही विद्यार्थिनी विजयी झाली. प्रत्यक्षात लोकशाहीचा उत्सव अनुभवता आल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. सडवली प्राथमिक शाळेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सडवली शाळेची थोडक्यात ओळख
पोलादपूर तालुक्यातील आदर्श शाळा, डिजिटल शाळा अशी सडवली शाळेची ओळख आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानात तालुक्यात प्रथम आलेली शाळा म्हणजे सडवली. शाळेचे मुख्याध्यापक आखाडे सर, शिक्षक सुनील पवार हे नेहमीच नवनवीन उपक्रम शाळेत राबवत असतात. शाळेतील विद्यार्थी कोडींग, डीकोडींग, वेबसाईट तयार करतात. दोन वर्षांपूर्वी केवळ २ पटसंख्या असणाऱ्या शाळेत सध्यस्थितीला २८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.






