Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • विद्यार्थ्यांच्या ‘बस’ समस्यांवर ‘हेल्पलाईन’ ठरली प्रभावी; ३०८ तक्रारींवरून एसटी प्रशासनाला नवी दिशा
Mumbai

विद्यार्थ्यांच्या ‘बस’ समस्यांवर ‘हेल्पलाईन’ ठरली प्रभावी; ३०८ तक्रारींवरून एसटी प्रशासनाला नवी दिशा

Students at ST bus stop as officials work on resolving issues through the helpline

Student bus helpline : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बससेवेवर अवलंबून असलेल्या लाखो शालेय विद्यार्थ्यांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकताच सुरू केलेला टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १८००२२१२५१ हा एक महान आधार ठरला आहे. विद्यार्थ्यांची सोय आणि सुरक्षितता हा उदात्त हेतू ठेवून सुरू केलेल्या या हेल्पलाईनवर, अवघ्या काही दिवसांत (आठवड्यात) तब्बल ३०८ तक्रारींची नोंद झाली आहे. ही आकडेवारी तात्पुरती चिंता दर्शवत असली तरी, ती एसटी प्रशासनाला मूलभूत त्रुटी सुधारण्यासाठी मिळालेली एक सुवर्णसंधी आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

प्रमुख तक्रारी: आता थेट ‘ॲक्शन’ मोडमध्ये

नोंदवलेल्या तक्रारींमध्ये अनेक गंभीर समस्या प्रामुख्याने समोर आल्या आहेत, या तक्रारी थेट मंत्र्यांच्या निदर्शनाखाली आल्या आहेत. यामध्ये वेळेवर बस न येणे, बस थांब्यावर न थांबणे, पासधारकांना प्रवेश नाकारणे यासारख्या गंभीर समस्यांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आता गांभीर्याने घेतले जात आहे. नियोजित थांब्यांवरही बस थांबत नसल्याच्या तक्रारींवर तातडीने लक्ष केंद्रित केले जात आहे.याशिवाय लांब पल्ल्याच्या बसमध्ये पासधारक शालेय विद्यार्थ्यांना चढण्यास मनाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

हे ही वाचा : दत्त जयंतीनिमित्त दुमदुमली नृसिंहवाडी; दोन लाख भाविकांची रेलचेल

जबाबदारी निश्चित; मंत्र्यांचा कठोर निर्णय

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली असून, त्यांनी तात्काळ हेल्पलाईन सुरू करून विद्यार्थ्यांचे म्हणणे थेट प्रशासनापर्यंत पोहोचवले आहे. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित आगार व्यवस्थापक व पर्यवेक्षकांना निलंबित करण्याच्या कठोर सूचना त्यांनी दिल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये ‘ कामाला न जुमानल्यास कठोर कारवाई ‘ करण्याची मानसिकता निर्माण होऊन व्यवस्थेत सकारात्मक बदल होत आहेत.

पुढील वाटचाल: तक्रार पेटी नव्हे, १००% निराकरण केंद्र

एसटी महामंडळाने आता केवळ हेल्पलाईनवर तक्रारींची नोंद न घेता, या ३०८ तक्रारींचा आधार घेऊन मूलभूत कामकाजात आणि कर्मचारी मानसिकतेत त्वरित सकारात्मक सुधारणा कराव्यात.असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.

विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणी दूर करणे हे एसटी महामंडळाचे सामाजिक आणि नैतिक कर्तव्य आहे. मंत्री महोदयांनी आता तक्रारींच्या ‘१००% निराकरणावर’ लक्ष केंद्रित केल्यास, हा हेल्पलाईन क्रमांक केवळ “तक्रार पेटी” न राहता, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, वेळेवर आणि सन्मानजनक प्रवासाची खात्री देणारे ‘विश्वास केंद्र’ बनेल. असे मत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी व्यक्त केली आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts