सोशल मिडियाच्या माध्यमातून आधी मैत्री केली आणि नंतर तिचे दागिनेही घेतले. सोशल मिडियावर व्हिडिओ टाकून तुला बदनाम करणार अशी धमकी मित्राने दिल्याने एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण नजीकच्या एका गावात घडली आहे. व्हिडिओ कॉल करुन तरुणीने आत्महत्या केली असल्याने या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. तिच्या प्रियकराने आणखी काही तरुणींना अशाच प्रकारे फसविले असल्याचा आरोप केला जात आहे.












