Satyacha Morcha : “मागे मी शब्द वापरला तो खुप गाजला. आता तुम्हाला सांगतोय जागे झालात जागे रहा नाही तर ‘अॅनाकोंड आयेगा’.. या अॅनाकोंडाला आता आपल्याला कोंडावेच लागेल. नाही तर हे सुधारणार नाहीत. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. एवढे सगळे पुरावे असताना राजने तर पुराव्यांचा डोंगरच दाखवला. रोज कुठून ना कुठून पुरावे येतात. तरी सुद्धा आपले राज्यकर्ते आणि निवडणूक आयोग, निवडणूक आयोग कसला भाजपचे नोकर आहेत ते. मी अॅनाकोंडा का बोलतोय, काही तर गंमत किंवा चेष्टा करायची म्हणून नाही बोलत,” असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि यांनी गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय निवडणूक आयोग यांच्यावर निशाना साधला.
“जमलेल्या माझ्या जागरूक देशभक्त आणि खऱ्या मतदार बंधु आणि भगिनीने आणि मातानो, म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरूवात केली. माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्रानंतर राज्यात सर्व राजकीय पक्षांची एकजूट आज पहिल्यांदा झाली असेल. ही विरोधी पक्षांची एकजूट नाही. ही लोकशाहीचं प्रतिनिधीत्व आणि लोकशाहीच नेतृत्व करणाऱ्या राजकीय पक्षाची एकजूट आहे. मतचोरी करणार्यांना सांगतोय की आज फक्त ठिणगी बघताय. या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल आणि तुमच्या बुडाखाली कधी आग लागेल तुम्हाला कळणार पण नाही,” असा हल्लाबोल ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर चढवला.
हे ही वाचा – Satyacha Morcha : ठाकरी तोफा धडकणार! राज ठाकरे लोकलने मोर्चासाठी रवाना..
माझे वडील चोरी करतात, ते कमी पडला म्हणून मतं चोरी करतात..
“यांची भूक शमत नाही. आपला पक्ष चोरला, निशाणी चोरली, नाव चोरलं एवढेच काय तर माझे वडील चोरायचा प्रयत्न करतायंत. तेही पुरेस नाही म्हणून आता मतचोरी करतायत. बाकी सर्व इकडे आलेले आहेत पण सत्ताधारी कोणी इकडे आलेला नाही. मुख्यमंत्री म्हणाले, लोकसभेच्या वेळेला आपण म्हणजे आम्ही विरोधकांनी कोणत्या मतदार संघात कसा लाभ घेतलाय त्याचा पर्दाफास करेल. मी मुख्यमंत्र्याना तुमच्या सर्वांच्या समोर सांगतोय, तुम्ही आमचा पर्दाफाश कराच.. करूनच टाका एकदा काय ते दूध का दूध आणि पाणी का पाणी,” असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र डागले.
मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केलंय की, मतं चोरी झालेली आहे
“पण जेव्हा मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केलं. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केलंय की, मतं चोरी झालेली आहे. मतं चोरी होतं आहे. मत चोरी करता येतंय. आज मला अभिमान आहे एक गोष्टीचा, आपण दरवेळी असं म्हणतोय की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय. आज हा संपूर्ण महाराष्ट्र आपल्या रुपामध्ये एकवटलेला आहे. आणि तो देशाला दिशा दाखवतोय. मी तुमच्या सगळ्यांवरती आता एक जबाबदारी टाकतोय. आपण आपले राजकीय पक्ष बाजूला ठेवून एकवटलेलो आहोत. ज्या गोष्टी आता आम्ही करतो आहोत, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, कम्युनिष्ठ, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते करतात. तसे मी राज्यातल्या नव्हे तर देशातला सर्वांनी आपापलं नाव आपल्या यादीत आहे का नाही हे पुन्हा जाऊन तपासा. आणि आपल्या घरामध्ये आपली परवानगी घेतलेली माणसं राहतात का नाही हे तपासा. कारण ज्या शौचालयात १०० माणसं राहात असतील. तर तुमच्या घरात किती राहू शकतात,” असा उपरोधिक टोला निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांनी लगावला.










