विदर्भातील धार्मिक नगरी शेगावला अखेर वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा मंजूर करण्यात आला आहे. नागपूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा शेगाव रेल्वे स्थानकावर देण्यात येणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामागे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची महत्त्वाची भूमिका आहे, त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून मागणी केली होती.












