Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • उन्हाळ्यापूर्वीच मूर्तिजापूरत पाणीटंचाई;‘आम्ही माणसं आहोत की जनावरं? नागरिकांचा संतप्त सवाल
ताज्या बातम्या

उन्हाळ्यापूर्वीच मूर्तिजापूरत पाणीटंचाई;‘आम्ही माणसं आहोत की जनावरं? नागरिकांचा संतप्त सवाल

Murtijapur water shortage

Murtijapur water shortage : जगाच्या पाठीवर सर्वाधिक तापमान नोंदवणाऱ्या अकोला जिल्ह्यात यंदा उन्हाळ्याची झळ सुरुवातीलाच जाणवू लागली असून, मूर्तिजापूर शहरातील घरकुल परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सुमारे ६०० घरांचा हा विस्तीर्ण परिसर आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

हेही वाचा – आरक्षित भूखंड विक्री वरून गणेश नाईक आक्रमक, एकनाथ शिंदेवर थेट हल्लाबोल

घरकुल परिसरात नियमित पाणीपुरवठा नसल्याने महिला, वृद्ध आणि लहान मुलांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. आधीच प्रखर उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पाण्याअभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यासोबतच परिसरात कचऱ्याची समस्या, स्वच्छतेचा अभाव आणि शौचालयांची गैरसोय असल्याने अनेक नागरिकांना आजही उघड्यावर शौचास जावे लागत आहे.

निवडणुकीच्या काळात मोठमोठी आश्वासने

या गंभीर समस्यांकडे मूर्तिजापूर नगर परिषद प्रशासन, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच अन्य लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे. “निवडणुकीच्या काळात मोठमोठी आश्वासने दिली गेली, मात्र निवडणूक संपताच कोणीही आमच्या परिसराकडे फिरकूनही पाहत नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

आमच्याशी जनावरांसारखी वागणूक का दिली जाते?

“आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. आम्हीही माणसं आहोत, मग आमच्याशी जनावरांसारखी वागणूक का दिली जाते?” असा थेट सवाल घरकुलवासीयांनी उपस्थित केला आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची भीती असून, तातडीने पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts