Dhurandhar 2 Operation Lyari viral video : सिनेसृष्टीत धुरंधर २ सिनेमाने (Dhurandhar 2 Movie) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘धुरंधर 2’ सिनेमाची चर्चा रंगलीय. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील या सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. या सिनेमातील अभिनेता संजय दत्त याने साकारलेल्या अस्लम चौधरी (Aslam Chaudhary) या भूमिकेला सिनेप्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय. सिनेमातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Social Media Videos) होत असताना, ‘ऑपरेशन ल्यारी’चा (Operation Lyari) खरा व्हिडीओ समोर आलाय.
हेही वाचा – ‘धुरंधर 2’मधील आर. माधवनच्या ‘त्या’ सीनवरून पेटला वाद; शिवसेना नेत्यांनी दिली आंदोलनाची चेतावणी
‘धुरंधर २’ सिनेमाचा बोलबाला सुरु असताना ऑपरेशन ल्यारी मधील अस्लम चैधरी याचा खरा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, अस्लम कराचीच्या ल्यारी परिसरात एक अत्यंत धोकादायक गुन्हेगारीविरोधी कारवाई करताना दिसत आहे.
अस्लम चौधरीचा खरा व्हिडीओ व्हायरल
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, गोळीबार सुरु आहे आणि एक पत्रकार घडत असलेल्या सर्व घटनांची माहिती देताना दिसत आहे. गोळींचा आवज, भयानक परिस्थिती आणि समोर दिसत असलेला अस्लम चौधरी, ‘धुरंधर २’ सिनेमा प्रदर्शिक झाल्यानंतर अस्लम चौधरी याचा खरा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Operation Lyari real footage , correctly depicted in Dhurandhar The Revenge. pic.twitter.com/7b5aCyEa3n
— Iron Hawk (@Iron_under_Flag) March 19, 2026
अस्लम चौधरी आक्रमक शैलीमुळे प्रसिद्ध
ऑपरेशन ल्यारी कराची येथील गँग हिंसेवर आळा घाल्यासाठी पोलिसांकडून करण्यात आलेला एक मोठा अभिनयान होतं. अस्लम चौधरी याला कायम ‘एनकाउंटर स्पेशलिस्ट’ असं म्हटलं जायचं. अस्लम चौधरी त्याच्या आक्रमक शैलीमुळे आणि गुन्हेगारी टोळ्यांशी वारंवार होणाऱ्या संघर्षांमुळे बराच प्रसिद्ध झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ सिनेमातील एका सीनशी मिळताजुळता आहे, ज्यामुळे लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
धुरंधर २ चा ९०० कोटींचा गल्ला पार
सध्या प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर २’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, १९ मार्च रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. एका आठवड्यात सिनेमाने दमदार कमाई केली आहे. जगभरात सिनेमा ९०० कोटींचा गल्ला पार केला आहे. सिनेमात रणवीर आणि संजय यांच्यासोबत अभिनेता अर्जुन रामपाल, आर माधवन आणि सारा अर्जुन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.






