56th International Film Festival Goa : आज भारताचा 56 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवाचे नाव आहे IFFI. या महोत्सवाच्या उदघाटनासाठी मोकळ्या जागेत भव्य व्याजपीठ उभारण्यात आले असून या महात्सवात देश-विदेशी कलाकारांसह चित्रपट रसिकांची कलाकुसर देखील अनुभवायला मिळणार आहे. याशिवाय हा महोत्सव 9 दिवस सुरु असणार आहे. या कार्यक्रमादरम्यान 81 देशांमधील 240 पेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.
हे हि वाचा : पुण्यातील पेट्रोल पंप संध्याकाळी 7 वाजेनंतर बंद ठेवण्याचा निर्णय मागे; नियमित सुरु राहणार पेट्रोलपंप
गोवा येथील कंपाल पणजी याठिकाणी असलेल्या जुन्या गोमेकॉसमोरील एका प्रशस्थ जागेत हा महोत्सव पार पडणार आहे. आज या महोत्सवाला सुरुवात होणार असून दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. या उद्घाटन सोहळ्यासाठी दक्षिणेतील प्रसिद्ध चित्रपट अभिनेते रामचरण, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित असणार आहे. याशिवाय कार्यक्रमाच्या निरोप समारंभावेळी बॉलिवूड अभिनेता आमिर खान याना निमंत्रित करण्यात आले आहे.
The 56th #InternationalFilmFestivalOfIndia will highlight inspiring, eco-conscious storytelling under the special ‘Mission Life’ section.
Join us in Goa for India’s biggest film festival and be part of the movement.#IFFI2025 #IFFI56 #IFFI #IFFIGoa@IFFIGoa @nfdcindia… pic.twitter.com/QOVj2qoWwJ
— Ministry of Information and Broadcasting (@MIB_India) November 19, 2025
या 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा फक्त महोत्सव नसून तो चित्रपट महोत्सवापेक्षा अधिक आहे या महोत्सवात अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळेल. यामध्ये 13 जागतिक प्रीमियर, 5 आंतरराष्ट्रीय प्रीमियर आणि 46 आशियाई प्रीमियरसह 81 देशांमधील 240 हून अधिक चित्रपटांची मेजवानी असणार आहे. या महोत्सवात जपान 6 चित्रपटांचे प्रदर्शन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Honoured to share that our film #ARM has been officially selected for the prestigious Indian Panorama’s Best Debut Director Competition at the 56th International Film Festival of India (IFFI) 2025, Goa).
Out of the five Indian films chosen, ARM is the only Malayalam film in the… pic.twitter.com/YDaxo2ZIBA— Tovino Thomas (@ttovino) November 6, 2025
रजनीकांतला मिळणार जीवनगौरव पुरस्कार
या महोत्सवात गुरु दत्त, राज खोस्ला, रित्विक गटक, पी. बहनुमथी, भूपेन हझारिका आणि सलील चौधरी यांच्या चित्रपटांना सन्मानित करण्यात येणार आहे. तर साऊथ अभिनेता रजनीकांतला या महोत्सवात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर यंदा पहिल्यांदाच एआय फिल्म हॅकॅथॉन आयोजित करण्यात आला आहे. 8 तसंच सर्जनशील स्प्रिंट हा फिल्ममेकिंगमध्ये एआय आधारित नवीन कल्पनांचा शोध घेत असून चित्रपटाचा प्रभाव वाढवण्यासाठी एआय हे प्रभावी साधन म्हणून वापरण्यात येत आहे.








