Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न, भारतीय सिनेविश्वाचा भव्य उत्सव साजरा
Top News

७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न, भारतीय सिनेविश्वाचा भव्य उत्सव साजरा

भारतीय चित्रपट सृष्टीतला सर्वोकृष्ट सन्मान मनाला जाणारा ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आज संपन्न झाला. दिल्लीच्या विज्ञान भवनात हा चित्रपट सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुख्य आकर्षण होते. तसेच, राष्ट्रपती यांच्याहस्ते विविध श्रेण्यातल्या विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यंदाचा पुरस्कार विशेष होता.

या राष्ट्रीय पुरस्काराने चित्रपटांची कला, संस्कृती आणि सन्मान याचा आदर राखण्यात येतो. भारतीय सिनेमा किती तरी वैविध्यपूर्ण, सर्जनशील आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार आहे, हे चित्रपटांनी सिद्ध केले. तसेच, हिंदीसह मराठी, मल्याळम, आणि अन्य भाषांतील कलाकार, दिग्दर्शक सोबतच विविध विभागातील व्यक्तींचा यथोचित सन्मान करण्यात आला. या सोहळ्यादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.

मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार मोहनलाल यांना यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील आजीवन योगदानासाठी दिला जात असून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दिला जातो. अभिनेता मोहनलाल यांचा अभिनय आणि योगदान लक्षात घेता त्यांचा सन्मान सगळ्या अर्थी योग्य ठरतो.

शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांचे पहिले राष्ट्रीय पुरस्कार

बॉलीवूडमधील कधी काळी चित्रपट सृष्टी गाजवणारे दोन दिग्गज कलाकार अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांना त्यांच्या अप्रतिम अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले.
अभिनेता शाहरुख खानला “जवान” चित्रपटातील भूमिकेसाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अभिनेत्री राणी मुखर्जीला “मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे” या चित्रपटातील तिच्या भावनिक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

‘१२वी फेल’ अभिनय सन्मानित

अभिनेता विक्रांत मॅसीला “१२वी फेल” या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून देण्यात आला. हा देखील विक्रांत मॅसीच्या कारकिर्दीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे, ज्याने त्याच्या अभिनय क्षेत्रातील योगदानाला नवी ओळख दिली.

पार्श्वगायिका पुरस्कार शिल्पा राव यांना जाहीर

‘जवान’ चित्रपटातील ‘चलेया’ या रोमँटिक गाणं गाणाऱ्या पार्श्वगायिका शिल्पा राव यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या आवाजाला रसिकांनी भरभरून दाद दिली.

‘सॅम बहादूर’ या चित्रपटाची पुरस्कार लयलूट

या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्टचा पुरस्कार श्रीकांत देसाई यांना प्रदान
सचिन लोवलेकर, दिव्या गंभीर आणि निधी गंभीर यांना सर्वोत्कृष्ट वेशभूषा डिझायनर पुरस्कार
हा चित्रपट भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे.

 

मराठी चित्रपटांचा राष्ट्रीय स्तरावर बोलबाला

७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये मराठी सिनेमा सुद्धा मागे राहिला नाही. या पुरस्कारांमध्ये मराठीने मानाचा तुरा रोवला आहे.
‘श्यामची आई’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून सन्मानित
याशिवाय ‘नाळ २’ आणि ‘आत्मपॅम्फ्लेट’ या दोन मराठी चित्रपटांनाही विशेष पुरस्कार
‘श्यामची आई’ चित्रपटाने मातृत्व आणि संस्कार यांचे भावनिक दर्शन घडवले असून ‘नाळ २’ आणि ‘आत्मपॅम्फ्लेट’ या दोन्ही चित्रपटातील बालकलाकारांचा गौरव करण्यात आला असून मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

नवीन कलाकारांना प्रोत्साहन आणि अनुभवी कलाकारांना गौरव देणारा हा सोहळा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक ऐतिहासिक पर्व ठरला असून नवीन कलाकार यातूनच घडतात.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts