मुंबईत नुकताच शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खान दिग्दर्शित ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेबसीरिजचा भव्य प्रीमियर पार पडला. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. या खास प्रसंगी आर्यनसोबत चर्चेत आलेली ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री लॅरिसा बोनेसीही उपस्थित होती.
लॅरिसाने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस आणि आकर्षक अॅक्सेसरीजसह रेड कार्पेटवर ग्लॅमरस एंट्री केली, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. लॅरिसा आणि आर्यन यांच्यातील नात्याच्या चर्चांना यामुळे पुन्हा एकदा उधाण आले आहे. आर्यन खानचे लॅरिसासोबतचे नाते गेल्या काही काळापासून गॉसिपचे केंद्रबिंदू ठरत आहे. लॅरिसाने ‘देसी बॉईज’मधील ‘सुबह होने ना दे’ या गाण्यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तसेच ती गुरु रंधावा याच्यासोबत ‘सूरमा सूरमा’ गाण्यातही झळकली आहे.
आर्यन आणि लॅरिसाने त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले नसले, तरी बॅड्स ऑफ बॉलिवूडच्या प्रीमियरला तिची खास उपस्थिती हीच त्यांच्या जवळीकतेचा स्पष्ट संकेत देत आहे. शाहरुख खानची ‘भावी सून’ अशीही लॅरिसाची सध्या चर्चा सुरू आहे.
‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ सिनेमातील कास्ट
‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ सीरिजमध्ये लक्ष्य ललवानी, राघव जुयाल, बॉबी देओल आणि सहर बंबा मुख्य भूमिकेत आहे. तर ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ बॉलिवूडचे अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी देखील दिसणार आहेत. सीरिजमध्ये बॉलिवूड कसं आहे… हे दाखवण्याचा प्रयत्न आर्यन खान याने केला आहे. सिनेमात करण जोहर, शाहरुख खान, रणवीर सिंग, सलमान खान आणि आमिर खान यांच्यासोबत अन्य सेलिब्रिटी देखील दिसणार आहेत…
कथा काय आहे?
‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ ही कथा आसमान सिंग (लक्ष्य) भोवती फिरते, जो बॉलीवूडमध्ये मोठे होण्याचे स्वप्न पाहतो. वाटेत, त्याला इंडस्ट्रीचे ग्लॅमर आणि लूक तसेच त्यातील धूर्त आणि निर्दयी वास्तव कळते. रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्मित, ही मालिका विनोद आणि नाट्याचे मिश्रण आहे. नेटफ्लिक्स याला “आतापर्यंतचा सर्वात वाईट आणि फिल्मी शो” म्हणत आहे, ज्यामध्ये भरपूर कॅमिओ, थ्रिल आणि चित्रपट उद्योगाच्या मजेदार जगाची झलक आहे.