Asurvan actor death : मराठी मनोरंजन विश्वातून एक खळबळजनक, हादरवून टाकणारी घटना समोर अली आहे. काही दिवसांनी रिलीज होणाऱ्या असुरवन चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा सचिन चांदवडे या अभिनेत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. असुरवं चित्रपटाच्या रिलीज पूर्वीच त्याने टोकाचे पॉल उचलून त्याची जीवन यात्रा संपवली.
असुरवन चित्रपटात सोमा हे पात्र साकारणाऱ्या सचिन चांदवडे या नवोदित अभिनेत्याने आत्महत्या केली आहे. त्याचा चित्रपट या आठवड्यात रिलीज होणार होता. परंतु यापूर्वीच या अभिनेत्याने आयुष्य संपवले. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. त्याने आत्महत्या का केली असा सवाल उपस्थित होत असून यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु 25 व्य वर्षी त्याने टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
सचिन चांदवडे हा जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे गावातील होता. त्याचा असुरवन हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होणार होता, तर या चित्रपटाचे प्रमोशन देखील जोरदार सुरु होते. त्यापूर्वीच या अभिनेत्याने आयुष्य संपवल्यामुळे आत्महत्येचे कारण नेमके काय ? हा सवाल उपस्थित होत आहे.
View this post on Instagram
अभिनेता सचिन चांदवडे जमतारा २, असुरवन या दोन्ही चित्रपटांमध्ये झळकणार होता. त्याच्या करियरबद्दल बोलायचं झालं तर अभिनयासह तो पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून देखील कार्यरत होता. एवढेच नाही तर पुण्यातील प्रसिद्ध कलावंत या ढोलताशा पथकामध्येही तो सहभागी असायचा. बऱ्याच मराठी कलाकारांसोबत त्याचे मैत्रीचे संबंध होते. एक देखणा, नवोदित अभिनेत्याने आयुष्य संपवल्यामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (Asurvan actor death)












