Bands of Bollywood defamation case : नुकताच शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याचा बॅट्स ऑफ बॉलीवूड ही वेब सिरीज रिलीज करण्यात आली. या वेब सिरीजला प्रचंड प्रतिसाद मिळत असून आता ड्रग्स प्रकरणानंतर बँड्स ऑफ बॉलीवुड वेब सिरीज मधील एका भूमिकेबद्दल आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून मानहानीचा दावा केला आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडवर गंभीर आरोप लगावले आहेत. त्यांनी या कंपनीविरुद्ध दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात सविस्तर उत्तर दिले आहे.
प्रतिमा मलीन करण्यात आल्याचा आरोप (Bands of Bollywood defamation case)
बँड्स ऑफ बॉलीवूड या वेब सिरीज च्या माध्यमातून आपली प्रतिमा मलीन करण्यात आल्याचा आरोप वानखेडे यांनी लगावला असून याप्रकरणी खटला दाखल केला आहे. या वेब सिरीज मध्ये कोणत्याही प्रकारे कलात्मक अभिव्यक्ती नसून सूडाची भावना आणि केवळ पैसा कमावण्याच्या लालसेवर आधारित सुनियोजित हल्ला असल्याचा आरोप त्यांनी केला.
रेड चिलीज ने तयार केलेली बदनामीकारक सिरीज इंटरनेटवर अत्यंत वेगाने पसरत असून एका सन्मानित सरकारी अधिकाराच्या जीवनावर आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. यामुळे नुकसान कधीही भरून काढता येणार नाही. एका सरकारी अधिकाऱ्याला सहानुभूती दाखवण्या ऐवजी रेड चिलीज कंपनीची गैरकृती योग्य ठरण्याचा प्रयत्न करत आहे. या कंपनीचा दृष्टिकोन फक्त व्यावसायिक फायदा आणि वैयक्तिक सूडबुद्धीने प्रेरित असल्याचे दिसते असे आरोप समीर वानखेडे यांनी केले आहेत.
रेड चिलीज कंपनीने सांगितलं की, या वेब सिरीज मध्ये उपहास असून पूर्णपणे काल्पनिक आहे. परंतु समीर वानखेडे यांनी हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. यातील पात्राचा चेहरा आणि शरीराची ठेवण वानखेडे यांच्याशी मिळतील जुळती आहे. पात्राचे बोलणं आणि काम करण्याची पद्धत हावभाव वानखेडे यांच्यासारखे आहेत. पात्र चित्रपट उद्योगातील एका प्रभावशाली व्यक्तीला अटक करतो जी थेट आर्यन खान अटक प्रकरणाशी जोडली आहे.
मानहानी झाल्यामुळे फक्त त्यांना नव्हे तर त्यांची पत्नी आणि बहिणीला देखील लोकांकडून सातत्याने आक्षेपार्ह आणि घाणेरडे मेसेजेस येत असतात. रेड चिलीज ने त्यांच्यावर थिन स्किन अधिकारी असल्याचा केलेला आरोप त्यांनी फेटाळून लावला असून एक सरकारी अधिकारी सार्वजनिक पदावर कार्यरत असला म्हणून त्याला निराधार बदनामी सहन करावी लागणे अनपेक्षित आहे, असं समीर वानखेडे यांनी कोर्टात स्पष्ट केले












