Bharti Singh statement : कॉमेडी क्वीन भारती सिंह ही नेहमीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असते. तिने तिच्या कॉमेडीने सर्व चाहत्यांच्या मनात स्थान मिळवले आहे. काही दिवसांपूर्वी भारतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. भारतीने सोशल मीडियावर तिला मुलगी हवी आहे अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु आता तीने मुलींबाबत एक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे आता ती चांगलीच चर्चेत आली आहे.
भारती सिंहला यापूर्वी एक मुलगा आहे. ज्याचे नाव गोला असून तो देखील सोशल मीडियावर फार फेमस आहे. भारती सिंह सोशल मीडियावर ब्लॉग च्या माध्यमातून अनेकदा मुलगी हवी असं म्हणताना दिसली. परंतु भारतीला मुलगी नाही तर मुलगा झाला. परंतु ती आता याउलट बोलताना दिसली.
हे ही वाचा : द कपिल शर्मा शोमध्ये जज म्हणून काम करणाऱ्या अर्चना पुरण सिंहला गंभीर आजाराने घेरले; मुलाने दिली माहिती
हे दुःख माझ्याकडून सहन झाले नसते
भारती म्हणते, देवाची मी खरोखरच मनापासून आभारी आहे. मला दोन मुलं दिली… परंतु मला मुलगी दिली नाही, कारण तिचे संगोपन करून तिला लहानाचे मोठे करायचं. आणि तिचे लग्न करून तिला दुसऱ्यांच्या घरी पाठवायचं हे दु:खच माझ्याकडून सहनच झाले नसते. त्यामुळे ज्यांना मुली आहेत ते आई वडील खरच धन्य आहे. जेव्हा गोला मला फक्त घर सोडून जातो असं बोलला तेव्हा मला काही कळत नव्हते, मी प्रचंड भावूक झाले होते. मुलींना लग्न करून सासरी पाठवणे कठीण काम असून माझे दोन डोळे माझे गोला आणि काजू आहेत. मी आता दोन मुलांची आई झाली आहे….असं वक्तव्य भारतीने केले.
मुलं आई वडिलांना सोडून देतात
मुले आईवर जास्त प्रेम करतात आणि मुली या वडिलांवर जास्त प्रेम करतात असं मी ऐकलं होतं. त्यामुळेच हर्षला मुलगी हवी होती. काजूला सांभाळत असताना भारती सिंह म्हणते की, गोला लहानाचा मोठा कसा झाला हे काही समजलंच नाही. गोला बाळासारखा कधी राहिलाच नाही. परंतु दुसरा मुलगा काजू बऱ्यापैकी मुलांसारखा राहतो, वागतो. मुलं आईवडिलांना सोडून देतात …ते चुकीचे आहे असं देखील भारती म्हणाली.
कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी 2017 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर 2022 मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला. त्याचे नाव लक्ष लिंबाचिया असून त्याला लाडाने गोला म्हंटले जाते. भारती सोबतच गोला देखील फेमस आहे. तर आता त्यांना दुसरा देखील मुलगा झाला असून त्याचे टोपण नाव काजू ठेवण्यात आले आहे.







