bigg boss marathi season 6 : बिग बॉस मराठीच्या 6 व्या सिझनला नुकतीच सुरुवात झाली. या सिझनमध्ये पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांमध्ये वादविवाद झाल्याचे बघायला मिळाले. कलर्स मराठीने नॉमिनेशन टास्कचा एक प्रोमो शेअर केला होता. या प्रोमोमध्ये स्पर्धकांमध्ये चांगलीच चकमक बघायला मिळाली. सागर कारंडे आणि तन्वी कोलते यांच्यात जोरदार वाद झाल्याचे बघायला मिळाले. यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आले आहे. जोरदार भांडणानंतर तन्वी कोलते रडताना दिसत असून सागर कारंडे देखील या व्हिडिओ मध्ये शांत दिसत आहे.
या प्रोमो व्हिडीओमध्ये नॉमिनेशन टास्कवेळी सागर कारंडे यांचा फोटो असलेला पतंग तन्वी कोलते यांनी कापल्याचे दिसत होते. त्यानंतर तिने सागर कारंडे यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले. आणि बिग बॉसच्या घरातील संपूर्ण वातावरण जास्तच तणावग्रस्त झाल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर मात्र तन्वीच्या भावनांना बांध फुटल्याचे दुसऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
वादानंतर शांतता
या वादानंतर तन्वी कोलते अचानकच भावूक झाल्याचे बघायला मिळाली. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. ती एवढी रडत होती की, तिला स्वतःला रडू आवरत नव्हते. तिचे रडणे पाहून घरातील सदस्य देखील भावुक झाले. सर्वानी वादविवाद सोडून तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर यावेळी सागर कारंडे यांनी देखील आक्रमक पवित्रा सोडून नमतं घेतलं.
सागर कारंडेही भावुक
बिचारी…. मला खरंच तिचे वाईट वाटत आहे. तिने जर माझ्याकडे येऊन सर्वकाही सांगितले असते तर मी तिला शांत केले असते. असं तो यावेळी म्हणताना दिसला. सागर कारंडे यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे दोघांमधील वाद संपणार असल्याचे चित्र दिसत आहे. या व्हिडिओचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.












