Border 2 Ghar Kab Aaoge song : 2026 या वर्षाच्या सुरुवातीला 2 जानेवारी रोजी बॉर्डर 2 चित्रपटातील ‘घर कब आओगे‘ हे गाणे अधिकृतरीत्या जैसलमेर येथे लॉन्च करण्यात आले. हे गाणे आपल्या संपूर्ण देशासाठी भावनिक आहे. भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य आणि बलिदानाचा संदेश देणारे हे गाणे असल्याचे मत वरून धवन यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी ANI सोबत बोलताना हे वक्तव्य केले.
ANI सोबत साधला संवाद
बॉर्डर 2 हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2 जानेवारी रोजी या चित्रपटाचे गाणे जैसलमेर येथे लॉन्च करण्यात आले. यावेळी ANI सोबत संवाद साधताना त्यांनी या गाण्याबद्दल त्यांचे मत व्यक्त केले. ते म्हणाले कि, ‘हे गाणे फक्त चित्रपटाच्या टिमसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी भावनिक गाणे आहे. ज्या ठिकाणी बॉर्डरचे शूटिंग पूर्ण झाले त्याच भागात हे गाणे लॉन्च करण्यात आले. हे अधिकच विशेष ठरले.’ त्यानंतर त्यांनी प्रेक्षकांना 23 जानेवारीला सिनेमागृहात जाऊन बॉर्डर 2 नक्की पाहण्याचे आवाहन केले.
हे ही वाचा : मेरठ प्रकरणावर आधारित डॉक्यु सीरिजचे पहिले पोस्टर आले समोर; 9 जानेवारीला या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
संपूर्ण पिढीत देशभक्तीची भावना निर्माण करण्याचे काम केले
पुढे भारतीय लष्कराविषयी ते पुढे म्हणाले कि, सनी देओल यांनी सांगितल्याप्रमाणे लहानपणी हकीकत पाहून सशस्त्र दलांवर चित्रपट करायचं स्वप्न पहिले. त्याप्रमाणे मी लहान असताना बॉर्डर पाहिल्यानंतर मला गणवेशातील भूमिका करण्याची इच्छा झाली. मी कधीही विचार केला नव्हता की, घर कब आओगे या गाण्याचा आणि बॉर्डर 2 चित्रपटाचा मी भाग बनेल. बॉर्डर सारख्या चित्रपटाने एका संपूर्ण पिढीत देशभक्तीची भावना निर्माण करण्याचे काम केले. आणि लष्कराविषयी अभिमान वाढवला.
#WATCH | Jaisalmer, Rajasthan: On the launch of ‘Ghar Kab Aaoge’ song from Border 2, Actor Varun Dhawan says, “This is a very emotional song for us and for the entire country. I felt great coming here to launch this song…” pic.twitter.com/px59sx0TdZ
— ANI (@ANI) January 3, 2026
तरुणांना सशस्त्र दलांच्या शौर्याची जाणीव
बॉर्डर 2 या सारखे चित्रपट तरुणांना सशस्त्र दलांच्या शौर्याची जाणीव करून देतात. भारत हा प्रेम, शांतता आणि बंधुभाव यावर विश्वास ठेवणारा देश आहे. परंतु आपल्या देशाचे शौर्य किती मोठे आहे हे समजण्यासाठी बॉर्डरसारखे चित्रपट महत्वपूर्ण असल्याचे अभिनेता वरून धवन म्हणाले.
‘BORDER 2’ NEW POSTER ARRIVES – TEASER OUT ON 16 DEC 2025 – 23 JAN 2026 RELEASE… #TSeries and #JPFilms have dropped the new poster of #Border2, featuring #SunnyDeol, #VarunDhawan, #DiljitDosanjh, and #AhanShetty.#Border2Teaser will be launched on [Tuesday] 16 Dec 2025 on the… pic.twitter.com/aUp50ViTvY
— taran adarsh (@taran_adarsh) December 12, 2025
कधी होणार चित्रपट रिलीज
बॉर्डर 2 या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले आहे. या चित्रपटात सनी देओल, वरून धवन, दिलजीत दोसांज, अहान शेट्टी, मोना सिंग, मेधा राणा, सोनम बाजवा, अनन्या सिंग यांचा दमदार अभिनय बघायला मिळणार आहे. हा चित्रपट भूषण कुमार, कृष्ण कुमार, जे.पी. दत्ता आणि निधी दत्ता यांनी निर्माता म्हणून काम केले आहे. हा चित्रपट 23 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.












