Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांची भावनिक पोस्ट
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांची भावनिक पोस्ट

Old photo of Dharmendra and Hema Malini together, shared after Dharmendra’s demise as an emotional tribute

Hema Malini emotional post : हिन्दी चित्रपट सृष्टीत अधिराज्य गाजवलेले अभिनेता धर्मेंद्र देओल यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर 3 दिवसांनी त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी अत्यंत भावनिक पोस्ट करत सोशल मिडियावर भावना व्यक्त केल्या आहे. त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत घालवलेले काही खास क्षण आणि आठवणी फोटोच्या माध्यमातून शेअर केली. धर्मेंद्र यांची प्रकृती अनेक दिवसांपासून खराब होती. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला होता. परंतु घरी गेल्यानंतर काही दिवसांनी धर्मेंद्र यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने बॉलीवूड आणि त्यांच्या चाहते वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय म्हणाल्या हेमा मालिनी

“धर्मेंद्रजी माझ्यासाठी खूप काही होते. ते प्रेमळ पती, ईशा आणि अहाना दोन्ही मुलींचे प्रेमळ वडील, मित्र, तत्वज्ञानी, मार्गदर्शक, कवी, खरं तर, तो माझ्यासाठी सर्वकाही होता! आणि ते नेहमीच चांगल्या आणि वाईट काळातून गेले आहे. सोप्या, मैत्रीपूर्ण वागण्याने, नेहमीच सर्वांमध्ये प्रेम आणि रस दाखवून तो माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रिय झाला. एक सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून, त्याची प्रतिभा, त्याची लोकप्रियता असूनही त्याची नम्रता आणि त्याचे सार्वत्रिक आकर्षण त्याला सर्व दिग्गजांमध्ये अतुलनीय एक अद्वितीय प्रतीक म्हणून वेगळे करते. असे लिहीत त्यांनी धर्मेंद्रजी सोबतच फोटो शेयर केला.चित्रपट उद्योगात त्याची कायमची प्रसिद्धी आणि कामगिरी कायम राहील. माझे वैयक्तिक नुकसान अवर्णनीय आहे आणि निर्माण झालेली पोकळी अशी आहे जी माझ्या उर्वरित आयुष्यभर राहील. वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यानंतर, माझ्याकडे अनेक खास क्षणांना पुन्हा जिवंत करण्यासाठी असंख्य आठवणी आहेत. असे म्हणत त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

 

अभिनेते असूनही होती मातीशी नाळ

अभिनेते म्हणून त्यांनी अभिनयासोबतच मातीशी देखील त्यांची नाळ जोडून ठेवली होती. त्यांना शेतीची प्रचंड आवड होती. ते ग्लॅमरच्या प्रकाशातून दूर जाऊन निसर्गात आपला जास्त वेळ घालवत असत. लोणावळ्यात त्यांचे 100 एक्कर फार्महाऊस आहे. या फार्महाऊस मध्ये ते स्वतः शेती करतात. त्याठिकाणी ते झाडे लावणे, जनावरांची देखभाल करणे, शेतीच्या कामात हातभार लावणे यासारख्या कामात मन रमवतात.

65 वर्षांची कारकीर्द :

1960 मध्ये “दिल भी तेरा हम भी तेरे” या चित्रपटातून धर्मेंद्र यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 1961 मध्ये आलेल्या “बॉयफ्रेंड” या चित्रपटात ते सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले.
धर्मेंद्र 65 वर्षे अभिनयात सक्रिय राहिले, त्यांनी असंख्य हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्यांनी शोले (1975), चुपके चुपके (1975), सीता और गीता (1972), धरमवीर (1977), फूल और पत्थर (1966), जुगनू (1973), आणि यादों की बारात (1973) यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं.

हे ही वाचा : धर्मेंद्र यांच्या मालमत्तेचे होणार किती हिस्से; कोण होणार वारसदार

धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट :

धर्मेंद्र 89 व्या वर्षीही काम करत होते. त्यांच्या निधनानंतर, त्यांचा शेवटचा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे. धर्मेंद्र यांनी “21” या चित्रपटात भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ते अगस्त्य नंदाच्या
वडिलांची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 25 डिसेंबर 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts