Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • दृश्यम 3 चा टिझर लॉन्च; या खास दिवशी येणार सिनेमागृहात
मनोरंजन

दृश्यम 3 चा टिझर लॉन्च; या खास दिवशी येणार सिनेमागृहात

“A scene showing Ajay Devgn’s powerful and intense look during the launch of the Drishyam 3 teaser

Drishyam 3 teaser launch : बॉलिवूड मधील सर्वात आतुरतेने वाट बघितला जाणारा चित्रपट म्हणजे दृश्यम 3. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. आता या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून चित्रपटाची रिलीज डेट देखील समोर आली हे. या चित्रपटाच्या पुढील पार्ट मध्ये काय घडणार ? पुढील पार्ट मध्ये काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आता अजय देवग च्या दृश्यम 3 या चित्रपटाची स्पर्धा धुरंधर सोबत होणार आहे.

हे ही वाचा : रणवीर सिंगची डॉन 3 मधून एक्झिट; आता कोणता अभिनेता ठरेल डॉन साठी पात्र

अभिनेता अजय देवगण महत्वाच्या भूमिकेत असलेला दृश्यम चित्रपटाने चाहत्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली हे. चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल सर्वांना उत्सुकता लागली असून दृश्यमच्या तिसऱ्या भागाचा ट्रेलर सोशल मीडियावर आज शेअर करण्यात आला. काही दिवसांपूर्वी अजय देवगण यांनी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा सोशल मीडियावर केली होती. आता टिझर बघून चाहते थक्क झाले आहे.

काय आहे टिझर मध्ये

या टिझर मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार दिसत हे. इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करण्यात आला असून रिलीज डेट बाबत देखील खुलासा करण्यात आला आहे. हा या चित्रपटाचा शेवटचा भाग असणार आहे. सोशल मीडियावर अजय देवगण यांनी या टिझर रिलीजची पोस्ट केली आहे. आणि यात लिहिलंय कि, ‘दृश्यम 3, दृश्यम डे …. शेवटचा भाग बाकी आहे. सिनेमागृहात 2 ऑक्टोबर 2026 रोजी बघू शकतात’.

दृश्यांवर अजय देवगणचा आवाज : शेवटचा भाग बाकी आहे

दृश्यम 3 या चित्रपटाच्या टिझर मध्ये अजय देवगण त्याच्या कुटुंबाला वाचवण्याबाबत बोलताना दिसत आहे. टिझर मध्ये दृश्यम 1 आणि दृश्यम 2 मधील काही दृश्य दिसत आहे. या दृश्यांवर अजय देवगणचा आवाज येतो, “जग मला अनेक नावांनी ओळखते. पण मला फरक पडत नाही. गेल्या 7 वर्षात जे काही घडले आणि जे मी केले , जे मी पहिले..जे दाखवले….. त्यातून मला एक समजले, या जगात प्रत्येकाचे सत्य वेगळे आहे. प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी आहे. माझे सत्यमाझ्या बरोबर फक्त माझे कुटुंब आहे. जो पर्यंत सर्व थकत नाही.. सर्व हारत नाही तो पर्यँत मी उभा आहेएक भिंत म्हणूनकहाणी अजून संपलेली नाही.. शेवटचा भाग बाकी आहे…”

चित्रपटातील कलाकार

या चित्रपटांमध्ये अजय देवगण यांची मुख्य भूमिका आहे. तर नायिकेच्या भूमिकेत श्रेया सरन असणार आहे. जी कि, अजय देवगणची पत्नी असेल. अजय देवग च्या मुलीच्या भूमिकेत इशिता दत्ता , तर तब्बू पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचा पहिला भाग 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. आणि दुसरा 2022 मध्ये प्रदर्शित करण्यात आला.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts