Diane Ladd Death News – ऑस्कर नामांकित ज्येष्ठ अभिनेत्री डायन लॅड यांचे निधन झाले आहे. त्यांनी कॅलिफोर्नियातील ओझाई येथील घरी 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. याबाबत त्यांची कन्या जुरासिक पार्क फेम अभिनेत्री लॉरा लॅड यांनी माहिती दिली.
सहा दशकांपेक्षा अधिक काळ अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री डायन लॅड यांनी अनेक भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी alice doesn’t live here anymore, wild at heart, rambling rose या चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी तीन वेळा ऑस्कर साठी नामांकन पटकावले होते.
डायन लॅड यांच्या निधनानंतर अभिनेत्री लॉरा लॅड यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून तिने तिच्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली की, ती एक विलक्षण व्यक्ती होती, सर्वोत्तम कन्या, प्रेमळ आई, जिव्हाळ्याची आजी , गुणी अभिनेत्री , संवेदनशील कलाकार आणि सहानुभूतीने ओथंबलेली… अशा व्यक्तीचा जन्म जणू स्वप्नातच घडला असावा. ती आमच्या सोबत होती हे आमचं मोठं भाग्य…
काही वर्षांपूर्वी अभिनेत्री डायन लॅड यांना गंभीर फुफुसाचा आजार झाला होता. या आजाराबद्दल त्यांनी स्वतः कबूल केलं होतं. या आजारामध्ये फुफुसांचं उतख हळूहळू कठीण आणि जखमी होत जातं. यामुळे श्वास घेण्यासाठी अडचण येते. या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून नेमकं कारण अजून देखील स्पष्ट झालेले नाही. (Diane Ladd Death News)












