Girija Oak Blue Saree Viral National Crush : निळ्या रंगाची साडी, त्यावर कॉन्ट्रास असं व्हाईट रंगाचे ब्लाउज अन गळ्यात छोटीशी ज्वेलरी. ना कोणता साज शृंगार, अगदी सिम्पल लूक मध्ये असलेली एक अभिनेत्री. जिने मराठी चित्रपट सृष्टीसोबतच हिंदी चित्रपट सृष्टीत देखील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. सध्या या सौन्दर्यवतीचे फोटोस समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. आणि या अभिनेत्रीच्या पोस्टवर प्रत्येक जण फिदा होत आहे. हि अभिनेत्री आहे तरी कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? हि अभिनेत्री म्हणजे मराठमोळी नायिका गिरीजा ओक. जिने मराठी चित्रपटसृष्टीतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. एवढेच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीत देखील चारचांद लगावले.

सध्या समाज माध्यमांवर अभिनेत्री गिरीजा ओक यांचे फोटो व्हायरल होत आहेत. ट्विटरवर सध्या ही अभिनेत्री ट्रेंडिंगवर आली असून तिच्या निळ्या रंगाच्या साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी एका युट्युब चॅनेलने तिचा इंटरव्ह्यू घेतला होता. या इंटरव्ह्यूदरम्यानची तिची एक क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यानंतर नेटकाऱ्यानी हि अभिनेत्री आहे तरी कोण असे विचारले आहे? तर काहींनी तिच्यासाठी आकर्षक कॅप्शन देखील दिले आहे. एवढेच नाही तर तिची तुलना साऊथ इंडियन अभिनेत्रींशी देखील करण्यात आली. अन काही क्षणात गिरीजा ओक ट्विटरवर ट्रेंडमध्ये आली. आणि युजर्सनी गुगल आणि इन्स्टाग्रामवर तिचं नाव सर्च केले.
Who’s this in the blue saree? Seen her trending drop the name if you know pic.twitter.com/GrqT3LsgGe
— Amaan (@its_amaan02) November 10, 2025
नवीन नॅशनल क्रश
समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी आणि युजर्सने तिची तुलना अमेरिकन अभिनेत्री सिडनी स्विनी आणि इटालियन मॉडेल मोनिका बेलुचीशी तुलना केली. तर काही जण ‘भारत का जवाब’ अशी कमेंट करत आहे. एवढेच नाही तर बऱ्याच जणांनी तिला ‘नवी नॅशनल क्रश’ अशी उपमा देखील दिली आहे.
वयाच्या 15 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण
अभिनेत्री गिरीजा ओक हिने वयाच्या 15 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मराठी चित्रपटात तिने गोष्ट छोटी डोंगरा एवढी, गुलमोहोर, अडगुळे मडगुळे या चित्रपटात काम केले. तर मालिका विश्वात तिने मुख्य नायिका म्हणून झी मराठी वरील लज्जा या मालिकेत काम केले. त्यानंतर तिने हिंदी मालिकांमध्ये दुसऱ्यांदा मुख्य भूमिका साकारली. तर या अभिनेत्रीने हिंदी चित्रपट सृष्टीत तारे जमीन पर, शोर इन द सिटी, सायकल किक, बाकी इतिहास, कला, जवान , द वॅक्सीन वॉर, इंस्पेक्ट्रर झेंडे यासारख्या चित्रपटात काम केले आहे.

कसे आहे तिचे वैयक्तिक आयुष्य (Girija Oak Blue Saree Viral National Crush)
गिरीजा ओक हिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती अभिनेता गिरीश ओक यांची मुलगी आहे. तिचा जन्म 27 डिसेंबर 1987 साली नागपूर येथे झाला. तिने तिचे ग्रॅज्युएशन मुंबई येथील कांदिवली पूर्व, येथील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स येथून बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने थिएटर वर्कशॉपमध्ये सहभाग नोंदवून जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर तिचे लग्न सुहृद गोडबोले यांच्याशी झाले आहे. ती मराठी अभिनेता, संवाद लेखक, चित्रपट निर्माता श्रीरंग गोडबोले यांची सून आहे.










