Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपट पाहण्याचे राज ठाकरे यांनी केले आवाहन; म्हणाले …..
Top News

पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपट पाहण्याचे राज ठाकरे यांनी केले आवाहन; म्हणाले …..

Raj Thackeray Shivajiraje Bhosale movie : नुकताच पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेक चाहत्यांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. यातच आता या चित्रपटावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट केली आहे.

मी दोन दिवसांपूर्वी माझे मित्र आणि एक उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट पाहिला. तुम्हाला आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाला पर्याय नाहीच असं म्हणत राज ठाकरे यांनी सर्वांना चित्रपट पाहण्याचे आवाहन या पोस्टमध्ये केले आहे.

हे हि वाचा : सिद्धार्थ जाधवची मांजरेकरांसाठी खास पोस्ट; म्हणाला, “माझ्या आयुष्यातील देवमाणूस

मराठी माणूस त्यांना हवं तसं वापरून फेकून द्यायचे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, आज फक्त मोठे मोठे महामार्ग, पूल आणि चमकदार घोषणा म्हणजे विकास अशी कल्पना रुजवली… कोणाचा विकास होतो की नाही माहित नाही.. परंतु सत्ताधाऱ्यांचा विकास नक्कीच होतो… धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की मग शेतकरी असो किंवा इथला मराठी माणूस त्यांना हवं तसं वापरून फेकून द्यायचे आणि मग हे मोकळे अशी टीका त्यांनी पोस्टच्या माध्यमातून केली.

एका बाजूस त्यांना पाऊस झोडपतो, आणि दुसऱ्या बाजूने सरकारी यंत्रणा

तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले की, या राज्यातील शेतकरी तर पार हतबल झालेला आहे. एका बाजूस त्यांना पाऊस झोडपतो, आणि दुसऱ्या बाजूने सरकारी यंत्रणा त्यांचा अमानुष छळ करते. या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र आणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं होतं. याच महाराष्ट्रात आता शेतकरी आत्महत्या करतो हे भीषण दुर्दैव… एवढेच नाही तर दुसरीकडे शहरात मराठी माणसांनाच घर नाकारायचीत आणि भाषेचा अपमान करणाऱ्यांना आश्रय द्यायचा आणि त्यांनी काय खायचं आणि काय नाही खायचं यावर बंधन आणणाऱ्यांचे लाड करायचे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट जरूर पहा

हे सगळं मराठी माणसाला दिसत नाहीये का ? दिसत असेल ही… पण जोपर्यंत तुमच्या मनात याविरोधात चीड निर्माण होणार नाही, आग निर्माण होणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणं सोडा अजून भीषण होईल. या सिनेमातून ही चीड महेश मांजरेकर, त्यांचे कलाकार आणि त्यांचे लेखक यांनी उत्तम मांडली आहे. हा फक्त चित्रपट नाही तर या टीमच्या मनातील अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता महाराष्ट्रातील जनतेने अनुभवयाला हवी. त्यासाठी माझं तुम्हाला आवाहन आहे की ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट जरूर पहा…

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts