Prajakta Mali no makeup look : मराठी चित्रपट सृष्टीत लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणारी प्राजक्ता माळी ही नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत असते. याशिवाय तिचा ग्लॅमर लुक बद्दल देखील तिला ओळखलं जातं. सध्या प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आणि याचं कारण आहे तिचा हटके लुक.
नुकताच बाप तुझे पायी या वेब सिरीजचा प्रीमियर कार्यक्रम मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी सर्व कलाकारांनी हजेरी लावलेली होती. एखाद्या कार्यक्रमांमध्ये नेहमीच ग्लॅमर अंदाजात दिसणारी प्राजक्ता माळी आज सिम्पल पांढरा शर्ट आणि जीन्स मध्ये दिसली. तिच्या ह्या लूकी ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. काहींनी तिचं कौतुक केलं तर काहींनी तिला प्रचंड ट्रोल केलंय.
या कार्यक्रमावेळी रेड कार्पेटवर उपस्थित असलेले कलाकार पारंपारिक लुक मध्ये नटून-थटून आलेले दिसले. तर प्राजक्ता माळी अत्यंत साध्या आणि सरळ अवतारात दिसली. दरवेळी कोणत्याही कार्यक्रमात साडीमध्ये किंवा एक डिझाइनर ड्रेस मध्ये दिसणारी प्राजक्ता साध्या सरळ लुक मध्ये आल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी तिचा ना मेकअप लूक होता नाही डिझायनर लुक. तिने फक्त पांढऱ्या रंगाचा साधा शर्ट आणि जीन्स परिधान केलेली होती. सध्या तिच्या या लूकची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहेत.
View this post on Instagram
मी आज अशा अवतारात आले
तिच्या या साध्या लुकवर फोटोग्राफसने प्रश्न विचारले तेव्हा तिने हसत उत्तर दिलं की, मी आज अशा अवतारात आले, तिच्या या प्रामाणिक आणि बिनधास्त उत्तराला उपस्थित असलेल्या मीडियाने पसंती दर्शवली. आणि हे सर्व काही एका व्हिडिओमध्ये कैद झालं. आता तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेक चर्चांना उधाण आले आहे.
प्राजक्ता माळी च्या साध्या लूक बद्दल तिने स्वतः सांगितले पण तिच्या साधेपणाने नेचरचे सर्वांनी कौतुक केलं. एरवी ग्लॅमरस भूमिकेत दिसणारी प्राजक्ताचा साधा अवतार बऱ्याच जणांना आवडला हे खरं परंतु काहींनी तिला याबद्दल अत्यंत टोल देखील केलं.
हे हि वाचा : पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाने केली एकाच दिवसात लाखो रुपयांची कमाई
प्राजक्ता माळी हिने मालिकांमधून चित्रपटांमधून आणि वेब सिरीज मधून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली. तिचा फुलवंती हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिचा चाहता वर्ग फार प्रचंड प्रमाणात वाढला. तिचा हा चित्रपट अप्रतिम आणि अतिशय हिट ठरला. सध्या ती महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालनाचे काम करते. (Prajakta Mali no makeup look)












