Marine Drive Sea Creature: मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरात समुद्राच्या लाटांसोबत किनाऱ्यावर आलेल्या एका मोठ्या सागरी जीवामुळे नागरिकांमध्ये काही काळ गोंधळांचे वातावरण निर्माण झाले. ही घटना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
व्हिडिओमध्ये हा सागरी जीव किनाऱ्यावरील मोठ्या दगडांमध्ये अडकलेला दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने सुरक्षा कर्मचारी आणि बचाव पथक घटनास्थळ दाखल झाले. त्यांनी दोरखंड आणि आवश्यक साधनांच्या मदतीने त्या जीवाला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
दुर्मिळ समुद्री प्राणी
तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये या जीवाबाबत अनेक चर्चा आणि अंदाज व्यक्त केले जात होते. काहींनी तो दुर्मिळ समुद्री प्राणी असल्याचे सांगितले, तर काहींनी वेगळ्या प्रकारच्या सागरी जीव असल्याचा अंदाज बांधला.
मिळालेल्या माहितीनुसार
नंतर समोर आलेल्या माहितीनुसार, हा एक सागरी सस्तन प्राणी असून तो मृत अवस्थेत किनाऱ्यावर आला होता. तज्ज्ञांच्या मते, अशा घटना समुद्रातील नैसर्गिक बदल, प्रदूषण किंवा इतर कारणांमुळे घडू शकतात.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. समुद्री जीवसृष्टीच्या संरक्षणाबाबतही नागरिकांनी चर्चा सुरू केली आहे. सध्या संबंधित प्राणी शवविच्छेदनासाठी आणि पुढील तपासासाठी प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे.





