Breaking News :
  • Home
  • गुन्हा
  • पुण्यात खळबळ! मित्रानेच केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार; नेमकं काय घडलं? जाणून घ्या
Pune

पुण्यात खळबळ! मित्रानेच केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Pune Crime News

Pune Crime News: पुण्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे, जिथे मित्रानेच मैत्रिणीवर अत्याचार केल्याची घटना घडली.

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर गुन्ह्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी वेगाने कारवाई करत तिघांना अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे मित्राने अश्शील फोटो व्हायरल करून तिला एका कॅफे मध्ये घेऊन अत्याचार केला आहे. ही घटना तळेगाव येथे घडली आहे.

हेही वाचा: बायकोचे लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध कळले, लग्नाच्या अवघ्या १२ व्या दिवशी तलाठी नवऱ्याने जीवन संपवले 

या घटनेनंतर मुलीने कुटुंबीयांना माहिती दिली आणि त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान आरोपीला मदत करणाऱ्या आणखी एका व्यक्तीचा सहभाग समोर आला. तसेच, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाची भूमिकाही असल्याचे पोलिसांना आढळले.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी, त्याचा सहकारी आणि संबंधित ठिकाणाच्या मालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, अल्पवयीनांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती कडक पावले उचलली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता वाढली असून, मुलांच्या ऑनलाइन आणि वैयक्तिक सुरक्षेबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts