Breaking News :
  • Home
  • Pune
  • जुन्नर हादरलं! १० वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचारानंतर हत्या; आरोपी ताब्यात
गुन्हा

जुन्नर हादरलं! १० वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचारानंतर हत्या; आरोपी ताब्यात

Junnar Girl Murder
42
Junnar Girl Murder: नसरापूर प्रकरणानंतर महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्नर तालुक्यात १० वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने जुन्नरसह संपूर्ण महाराष्ट्र संतापाची लाट उसळली आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर (Junnar) तालुक्यातील पिंपळवाडी (Pimpalwadi) परिसरात १० वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा संशय असून, या प्रकरणी २५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा:

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास वेगाने सुरु केली असून मुलीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान तिच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संशयित तरुणाने मुलीला सायकलवरून उसाच्या शेताच्या परिसरात नेल्याचा आरोप आहे. याच ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, घटनेमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे.

घटनेची माहिती समोर आल्यानंतर पिंपळवाडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील संशयितावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि पीडित मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली असून, तपासाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. पोलिसांकडून उपलब्ध पुरावे, घटनास्थळ आणि संबंधित व्यक्तींच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास केला जात आहे.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या प्रकरणाचा जलद आणि निष्पक्ष तपास करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts