Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुण्यात १००हून अधिक घरमालकांवर गुन्हे; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न देणं पडलं महागात, नेमकं काय घडलं?
Pune

पुण्यात १००हून अधिक घरमालकांवर गुन्हे; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न देणं पडलं महागात, नेमकं काय घडलं?

Pune tenant verification
6

– अमोल धर्माधिकारी, Pune Westin Beuro Head

Pune tenant verification: पुण्यात भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे नोंदवण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या १०० हुन अधिक घरमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आपलं घर भाड्याने दिलं की दर महिन्याला भाडं मिळतंय ना, मग बाकी कशाला लक्ष द्यायचं, आपण भलं आणि आपलं भाडं बरं, असा विचार करणं आता घरमालकांना महागात पडू शकतं. आपल्या घरात राहायला आलेला व्यक्ती नेमका कोण आहे, कुठून आलाय, त्याचा कायमचा पत्ता काय आहे आणि त्याने दिलेली कागदपत्रं खरी आहेत का, याची माहिती घेणं गरजेचं आहे. पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुण्यातील १०० हुन अधिक घरमालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल (Pune Landlords) केले आहेत. त्यामुळे घर भाड्याने देताना फक्त भाडं किती मिळणार याचा विचार न करता भाडेकरूची योग्य माहिती आणि पडताळणी कारणंही तितकंच महत्वाचं आहे.

हेही वाचा: लाडकी बहिणींना रक्षाबंधनासाठी 3,000 रुपये मिळणार? व्हायरल दाव्याचं खरं काय?

भाडेकरूची माहिती का महत्वाची?

पुण्यात शिक्षण आणि नोकरीसाठी देशभरातून हजारो लोक येतात. विद्यार्थी, IT कर्मचारी, कामगार, व्यावसायिक असे अनेक जण फ्लॅट, रूम किंवा पीजीमध्ये राहतात.

अशावेळी घरमालकांनी भाडेकरू कोण आहे, तो कुठून आला आहे, त्याचा कायमचा पत्ता काय आहे. आणि त्याचा मोबाईल नंबर काय आहे, याची माहिती ठेवणं गरजेचं आहे.

काही घरमालक ही माहिती घेतात, पण ती पोलिसांकडे नोंदवत नाहीत. अशा लोकांवर आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचं

समजा एखाद्या व्यक्तीने चुकीची किंवा बनावट माहिती देऊन पुण्यात घर घेतलं, तर पूढे काही गैरप्रकार झाला तर त्या व्यक्तीचा शोध घेणं पोलिसांसाठी अवघड होऊ शकतं. यामुळे भाडेकरू पडताळणी ही फक्त कागदोपत्री प्रक्रिया नसून शहराच्या सुरक्षेशी जोडलेली महत्त्वाची बाब आहे.

पुण्यात यापूर्वी भाड्याच्या घरात राहणाऱ्या संशयितांचा गंभीर गुन्हेगारी प्रकरणांशी संबंध असल्याचंही तपासात समोर आलं होतं. त्यामुळे पोलिसांकडून घरमालकांना वारंवार भाडेकरूंची माहिती देण्याचं आवाहन केलं जातं.

घर भाड्याने देताना काय करायचं?

घरमालकांनी भाडेकरू ठेवण्याआधी त्याचं ओळखपत्र, कायमचा पत्ता आणि मोबाईल नंबर तपासावा. भाडेकरारामध्ये दिलेली माहिती योग्य आहे की नाही, हेही पाहावं.

तसंच, नियमानुसार भाडेकरूची माहिती पोलिसांकडे नोंदवणं महत्त्वाचं आहे. कागदपत्रांमध्ये काही संशयास्पद आढळलं तर थेट पोलिसांना माहिती द्यावी.

थोडक्यात सांगायचं झालं तर, ‘भाडं मिळतंय ना, मग झालं’ असा विचार आता घरमालकांनी करू नये. भाडेकरूची योग्य पडताळणी केली नाही तर त्याचा फटका घरमालकांनाही बसू शकतो.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts