Pune Ganeshotsav : पुणे पोलिसांनी एक निर्णय घेतला आणि मॅटर थेट हायकोर्टापर्यंत पोहोचला, पुण्यात गणपतीच्या काळात तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दारुबंदी करण्यात आली, आता तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ड्राय डे ठेवण्यात आला, मात्र बाकी पुण्यात दारु विक्रिला परवानगी, याचा अर्थ नेमका काय काढायचा यावरून पुणेकरही कन्फ्यूज झाले होते, त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात पोहोचल्यानंतर कोर्टानंही यावर अत्यंत मिश्कील अशी टिप्पणी केलीय. पुण्यातल्या लोकांना पिण्याची बंदी का? असा मिश्कील सवाल करत कोर्टानं निर्णय मागे घ्यायला सांगितला, त्यामुळे हा गेम आता पूर्णपणे पलटलाय.
पुण्यात 12 दिवसांच्या दारूबंदीवरून हायकोर्टात याचिका
प्रत्येकजण दारु पिऊन धिंगाणा घालत नाही, सणासुदीला एखादा दारु पिऊन उत्साहच्या भरात असेल, तर तो कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेलच, असा दावा करता येणार नाही, गणपतीचा सण आहे, लोकांना तो साजरा करु द्या, अशा स्पष्ट शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य शासनाला बजावलं आहे. पुण्यातील 12 दिवसांच्या दारुबंदीला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी, न्यायमूर्ती अद्वैता सेठना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी कोर्टानं या प्रकरणावर सविस्तर भाष्य केलंय.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनानं उचलेलं हे चांगलं पाऊल आहे, मात्र याचा सर्व बाजुंनी विचार झाला पाहिजे. अशी बंदी फक्त पुण्यात का, अशी संपूर्ण महाराष्ट्रात का नाही, असा थेट कोर्टानं प्रशासनाला केलाय. ही बंदी 12 दिवसांची नाही, तर 14 तारखेला संध्याकाळी 4 वाजल्यापासून 25 सप्टेंबर, म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण दिवस आणि गणेशमूर्तींचे विसर्जन होईपर्यंत हा आदेश लागू राहील, असं जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं, याची नोंद घेत कोर्टानं ही सुनावणी तहकूब केलीय. एवढंच नाही तर सरसकट 12 दिवस दारुबंदी केल्यास रोज पिणाऱ्यांच्या आरोग्यवर गंभीर परिणाम होईल, दवाखाने तुडूंब भरून जातील, त्यामुळे अशी दारुबंदी योग्य ठरणार नाही, असंही यावेळी कोर्टानं म्हटलंय.
दारूबंदीवर हायकोर्टाने प्रशासनाला काय सुनावले? ( Pune dry day order )
गणेशोत्सव हा सण जरी धार्मिक असला, तरी त्या त पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची कमी नसते, तर पुण्यासारख्या शरात तर हे प्रमाण अधिक बघायला मिळतं, त्यामुळेच पोलिसांचा उद्देश जरी चांगला असला तरी एका भागात दारुबंदी आणि दुसऱ्या भागात दारुविक्री असं करून चालणार नाही, कारण कोणताही निर्णय हा सर्वसमावेशक असणं गरजेचं असतं, अन्यता ता परिणामकारक ठरत नाही. तेच आता पुण्याच्या बाबतीत घटना दिसतंय, कोर्टानं हेच अधोरेखित केलंय.
कोर्टानं केवळ पुण्याचीच प्रतिमा मलीन का?: “असा सरसकट निर्णय घेऊन तु्म्हाला काय दाखवायचे आहे? केवळ पुण्यातच लोक मद्यपान करून गैरवर्तन करतात का? मुंबई किंवा इतर शहरांत अशी बंदी नसताना सुशिक्षित आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यालाच का टार्गेट केले?” असा सवाल कोर्टाने केला. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असली, तरी १२ दिवस परवानाधारकांना व्यवसाय करण्यापासून रोखणारा एकतर्फी आदेश काढला जाऊ शकत नाही. प्रशासनाने हा आदेश मागे न घेतल्यास आम्ही तो रद्द करू, असा स्पष्ट इशारा न्यायालयाने दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ आपला जुना निर्णय बदलून नवीन परिपत्रक जारी केले. त्यामुळे पुण्यातली दारुबंदी आता पुरती फसली आहे.
हेही वाचा : अखेर माधुरी घरी आली! 409 दिवसांनी नांदणी मठात हत्तीणीची दिमाखात घरवापसी
गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ( Pune Ganeshotsav )
जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून, या १० दिवसांच्या काळात शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पुणे पोलिसांसमोर यंदाही मोठे आव्हान ठरत आहे. उत्सवाच्या काळात मुख्य बाजारपेठा आणि मध्यवर्ती भागात होणारी लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता, पोलिसांनी संपूर्ण पुणे शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. गर्दी आणि वाहतूक कोंडीचे मुख्य आव्हानउत्सवाच्या काळात मानाचे पाच गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी राज्यभरातून भाविक पुण्यात दाखल होत आहेत. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, आणि कुमठेकर रस्ता या मध्यवर्ती भागांत अलोट गर्दी होत असल्याने गर्दीचे व्यवस्थापन करणे हे पोलिसांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.
अनेक मार्गांवर वाहतूक वळवण्यात आल्याने शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटाशांतता राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाकडून शहरात हजारो पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस बल आणि होमगार्डच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी सोनसाखळी चोरी, पाकीटमारी आणि महिलांची छेडछाड रोखण्यासाठी गुन्हे शाखेचे कर्मचारी आणि ‘दामिनी पथक’ साध्या वेशात गस्त घालत आहेत. संवेदनशील भाग आणि मुख्य रस्त्यांवर शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून नियंत्रण कक्षातून 24 तास बारीक लक्ष ठेवले जात आहे.
Pune Ganeshotsav : उत्सवादरम्यान डीजे आणि ढोल-ताशा पथकांच्या आवाजाची मर्यादा पाळण्याचे मोठे आवाहन प्रशासनासमोर आहे. न्यायालयाने दिलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच, सोशल मीडियावरून कोणत्याही अफवा पसरू नयेत म्हणून सायबर सेल देखील हायअलर्टवर आहे. पोलिस प्रशासनाने गणेश मंडळांना सुरक्षेसाठी स्वतःचे स्वयंसेवक नेमण्याचे आणि संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे हा फिरलेला निर्णय आणि पोलिसांसमोरची आव्हान, हे सगळं पोलीस कसं पेलणार? हे गणेशोत्सवातच कळेल.









