Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पोरांचे केस कापायचे आहेत? आधी गुरुजींना फोन लावा! लक्ष्मीवाडीच्या शिक्षकांचा अनोखा ‘कटिंग फंडा’
लाईफस्टाईल

पोरांचे केस कापायचे आहेत? आधी गुरुजींना फोन लावा! लक्ष्मीवाडीच्या शिक्षकांचा अनोखा ‘कटिंग फंडा’

Laxmiwadi School Haircut
10

Laxmiwadi School Haircut : हल्लीच्या काळात फॅशन बदलतेय… त्यासोबत मुलांच्या हेअरस्टाईलही ! कुणाची झुलपं कपाळावर…कुणाच्या डोक्यावर भन्नाट कट…तर कुणाच्या केसांची स्टाईल पाहून, ही शाळा आहे की फॅशन शो? असा प्रश्न पडावा.. पण सांगलीच्या मिरज तालुक्यातील लक्ष्मीवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी यावर भन्नाट उपाय शोधलाय,पोरांचे केस कापायचे ? मग आधी गुरुजींना फोन करा..फोन आला की गुरुजी थेट सलूनमध्ये…आणि मगच सुरू होते… केसांवर कात्री फिरली आणि हेअरस्टाईलला शिस्त लावणाऱ्या भन्नाट प्रयोगाचा हा स्पेशल रिपोर्ट…

लक्ष्मीवाडीच्या शाळेत नेमकं काय सुरू आहे? ( Laxmiwadi School Haircut )

वर्गात पुस्तकं उघडली जातात… फळ्यावर धडे गिरवले जातात, आणि शिक्षक विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करतात, पण लक्ष्मीवाडीच्या या शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या डोक्यावरही लक्ष दिलं जातंय… यामागचं कारण म्हणजं विद्यार्थ्यांनी केलेल्या वेगवेगळ्य हेअरस्टाईल. प्रत्येकांच्या डोक्यावर वेगळा कट. कुणी केस वाढवलंले तर कुणी केस एकदम बारीक केलेले… ही एकप्रकारची बेशिस्तच. वर शिक्षकांसाठीही मनस्ताप आणि पालकांसाठीही कटकट. यावरुन पालक आणि शिक्षकांमध्ये उडणारे खटके…. होणारे वाद. केस नेमक कसे कापावे या विचारानं पालक हतबल.

मात्र सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या लक्ष्मीवाडी येथे पालकांचा हा त्रास कायमचा संपलाय. कारण, इथं केस कापण्यासाठी पालक नव्हे तर सलूनमध्ये मुलांसमोर चक्क गुरुजी उभं राहतात आणि सर्व प्रकारच्या फॅशनला फाटा देत साध्या पद्धतीने मुलांचे केस कापून घेतात… हे ऐकून थोडसं आश्चर्य वाटेल पण हे सगळं लक्ष्मीवाडीमध्ये शिक्षकांच्या कल्पक बुद्धीमुळं घडतंय..

हेही वाचा : शिष्याचा मृत्यू, तिघे बेपत्ता अन् आश्रमाबाहेर आंदोलन; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात नेमकं काय सुरू?

पालकांनी शिक्षकांच्या प्रयोगाला का दिली साथ? ( Student Discipline )

३ शिक्षकांनी मग पालकांशी संवाद साधला…“मुलांचे केस कापताना आमच्याशी एकदा फोनवर बोला…” एवढंच सांगितलं…आणि या छोट्याशा कल्पनेनं मोठा परिणाम घडवून आणला. मुलं सलूनमध्ये गेली की,प हिला फोन गुरुजींना ! आणि फोन येताच…गुरुजी थेट सलूनमध्ये पोहचतात.. मग काय…सलूनच्या खुर्चीवर विद्यार्थी…केस कापणाऱ्याच्या हातात कात्री…आणि समोर गुरुजी ! ना मनमानी कट…ना विचित्र स्टाईल…ना फॅशनचा अतिरेक! गुरुजींच्या देखरेखीखाली साधी, सरळ आणि शाळेला अनुरूप केशरचना. म्हणजेच…“कटिंग विद्यार्थ्यांची… पण स्टाईल गुरुजींची!”

विशेष म्हणजे…शिक्षकांनी हा निर्णय विद्यार्थ्यांवर लादला नाही. पालकांशी संवाद साधला…पालकांना विश्वासात घेतलं… आणि त्यातूनच या उपक्रमाला सुरुवात झाली. शिक्षकांचा हा प्रयोग पालकांनीही स्वीकारला. कात्रीनं केस कापले…पण या कात्री फक्त केसांवर चालली नव्हती, तर तिनं विद्यार्थ्यांच्या मनमानी दूर केली होती. मुलांना शिस्तीची सवय लावली होती. आज विद्यार्थ्यांच्या डोक्यावरची फॅशन थोडी कमी झाली पण आयुष्यातील शिस्त आणखी घट्ट झालीय. लक्ष्मीवाडीच्या गुरुजींचा हा अनोखा प्रयोग विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला ‘परफेक्ट कट’ देणारा म्हणावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts