Breaking News :
  • Home
  • शहर
  • पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमणांवर हातोडा; कारवाई रोखण्यासाठी फोन करणाऱ्यांची नावे जाहीर करणार?
Pune

पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमणांवर हातोडा; कारवाई रोखण्यासाठी फोन करणाऱ्यांची नावे जाहीर करणार?

Anti-encroachment drive in Pune for the third consecutive day; Municipal Corporation carries out campaign to remove encroachments
51
Pune Municipal Corporation :  शनिवारवाडा परिसरातही महापालिकेची धडक कारवाई; अतिक्रमणविरोधी मोहिमेत हस्तक्षेप करणाऱ्यांना आयुक्त नवल किशोर राम यांचा इशारा,पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. कारवाई रोखण्यासाठी फोन करणाऱ्यांची नावे जाहीर केली जाणार का? जाणून घ्या सविस्तर.

पुणे शहरातील अतिक्रमणांविरोधात महानगरपालिकेने कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. सलग तिसऱ्या दिवशी महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात येत असून, शनिवारवाडा परिसरातही कारवाई करण्यात आली. रस्त्यांवरील अतिक्रमण करून उभारण्यात आलेली घरे आणि दुकानांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. (Pune Action Mood)

या मोहिमेदरम्यान कारवाई थांबवण्यासाठी फोन करून दबाव आणणाऱ्यांची नावे जाहीर करण्याचा इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अतिक्रमणविरोधी कारवाईबरोबरच त्यात हस्तक्षेप करणाऱ्यांच्या भूमिकेचीही चर्चा सुरू झाली आहे.पुण्यातील अतिक्रमण हटाव मोहिमेचा आढावा आमचे प्रतिनिधी प्रथमेश तांबे यांनी घेतला आहे.

कारवाईचा धडाका किती दिवस सुरू राहणार?

शहरातील सार्वजनिक रस्ते आणि परिसर अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून ही मोहीम राबवली जात आहे. शनिवारवाडा परिसरातील कारवाईमुळे या मोहिमेची व्याप्ती पुन्हा चर्चेत आली आहे. पुढील काळात कोणत्या भागांत कारवाई होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (Municipal Acton)

LS Marathi – महाराष्ट्रातील बातम्या, पर्यटन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.

img

Shivani Nagarale

Content Writer

Shivani Nagarale | Digital Journalist | News Writer | Digital Content CreatorHello! I am Shivani Nagarale, a digital journalist with two years of experience in journalism and digital media. Since beginning my professional journey in 2023, I have gained experience in various aspects of media, including digital content creation, news writing, information research, and content development for digital platforms.Alongside journalism, I have developed an understanding of digital media and digital marketing, gaining insights into content performance, audience engagement, and effective ways of reaching readers across digital platforms.Currently, I am working as a Digital Journalist at Loksevay, under LS Marathi, where I contribute to digital news production, covering current affairs, diverse news topics, informative articles, and reader-focused content. My approach to journalism emphasizes thorough research, factual accuracy, objective reporting, and clear, engaging writing.I believe in continuously adapting to the evolving landscape of digital journalism, exploring emerging media trends, and strengthening my editorial skills. My professional goal is to create credible, informative, and engaging content that bridges the values of responsible journalism with the growing reach of digital media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts