Indian Air Force Air Show : नागपूर एअर फेस्ट 2026 मध्ये सुखोई-३०, सूर्यकिरण, सारंग आणि आकाशगंगा पथकाच्या हवाई कसरतींचा थरार अनुभवायला मिळणार आहे. एअर फेस्टचे वेळापत्रक, ठिकाण आणि खास आकर्षणे जाणून घ्या.
भारतीय हवाई दलाच्या शौर्य, (the Indian Air Force) सामर्थ्य आणि आधुनिक हवाई तंत्रज्ञानाची झलक दाखवणाऱ्या ‘एअर फेस्ट २०२६’चे आयोजन नागपूरमधील वायूसेना नगर येथे करण्यात आले आहे. आज (२२ नोव्हेंबर) या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नागपूरच्या आकाशात विविध लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि विशेष पथकांची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहायला मिळत आहेत. सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. मात्र, हवामानातील परिस्थितीनुसार हवाई प्रात्यक्षिके सुरू आहेत. पुढील दीड ते दोन तासांत विविध हवाई सादरीकरणांचा थरार अनुभवता येणार आहे.
सुखोई-३० एमकेआयपासून सूर्यकिरण पथकापर्यंत आकर्षण (Sukhoi -30 MKI)
या एअर फेस्टचे प्रमुख आकर्षण म्हणजे भारतीय हवाई दलाचे अत्याधुनिक सुखोई-३० एमकेआय (Su-30 MKI) लढाऊ विमान. यासोबतच सूर्यकिरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम आणि आकाशगंगा स्कायडायव्हिंग टीम आपली कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिके सादर करत आहेत.
सूर्यकिरण पथक आपल्या विमानांच्या समन्वयातून आकाशात विविध आकर्षक रचना आणि हवाई कसरती सादर करते. तर सारंग हेलिकॉप्टर पथक स्वदेशी बनावटीच्या ध्रुव हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अचूक हालचाली आणि समन्वयाचे प्रदर्शन करते. आकाशगंगा पथकाचे उंच आकाशातून पॅराशूटच्या साहाय्याने केले जाणारे स्कायडायव्हिंग हे देखील या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहे.
गरुड कमांडो आणि एअर वॉरियर ड्रिल टीमचेही सादरीकरण (Garud Commando Force and the Air Warrior Drill)
हवाई प्रात्यक्षिकांसोबतच भारतीय हवाई दलाच्या गरुड विशेष दलाकडून प्रात्यक्षिके सादर केली जात आहेत. गरुड कमांडो हे हवाई दलाचे विशेष प्रशिक्षित दल असून महत्त्वाच्या लष्करी मोहिमा, हवाई तळांची सुरक्षा आणि बचावकार्य यांसारख्या जबाबदाऱ्या पार पाडतात.
याशिवाय एअर वॉरियर ड्रिल टीमकडून शिस्त, अचूकता आणि उत्कृष्ट समन्वयाचे प्रदर्शन केले जात आहे. त्यामुळे या एअर फेस्टमध्ये केवळ लढाऊ विमानांचे प्रदर्शनच नव्हे, तर भारतीय हवाई दलाच्या विविध कार्यपद्धतींची ओळखही नागरिकांना होत आहे.
हेही वाचा : Tesla Flying Car : एलॉन मस्कची उडणारी कार भारतात चालेल का? ट्रॅफिकमध्ये काय होणार?
नितीन गडकरी प्रमुख पाहुणे
भारतीय हवाई दलाच्या मुख्यालयातील मेंटेनन्स कमांडच्या वतीने २१ आणि २२ नोव्हेंबर असे दोन दिवस या एअर फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी २२ नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यास सहमती दर्शवली आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, एनसीसी कॅडेट्सना आणि तरुणांना भारतीय हवाई दलाची कार्यक्षमता, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील संधींची माहिती मिळावी, हा मुख्य उद्देश आहे. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात सुमारे पाच हजार प्रेक्षक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशाबाबत महत्त्वाची माहिती
हा एअर फेस्ट वायूसेना नगर येथील सुरक्षित लष्करी परिसरात आयोजित करण्यात आला आहे. सुरक्षेच्या आणि कार्यात्मक कारणांमुळे कार्यक्रमस्थळी प्रवेश केवळ निमंत्रितांनाच देण्यात आला आहे. यासाठी नागपूरमधील शाळा, महाविद्यालये, एनसीसी कॅडेट्स आणि विविध नागरी संस्थांना निमंत्रित करण्यात आले आहे.
देशाच्या संरक्षणासाठी सज्ज असणारी लढाऊ विमाने, कुशल वैमानिकांचे कौशल्य, हेलिकॉप्टरची अचूक हालचाल आणि पॅराशूटच्या साहाय्याने होणारी प्रात्यक्षिके यामुळे नागपूरचा एअर फेस्ट (Nagpur Air Fest) विशेष ठरत आहे. भारतीय हवाई दलाची ताकद आणि शिस्त जवळून अनुभवण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून मिळत आहे.
LS Marathi – महाराष्ट्रातील बातम्या, पर्यटन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.









